
गेल्या आठवड्यात दोन बातम्यांनी मनात घर केलं. एक होती एक काळ गाजवणारा गायक मुकुंद फणसळकर देवाघरी गेल्याची आणि दुसरी होती विनोद कांबळीच्या सध्याच्या परिस्थितीची. दोन बातम्यात मला एक धागा दिसला तो म्हणजे मुकुंद असो किंवा विनोद घ्या, दोघेही कमालीचे गुणवान. दोघांनी प्रचंड मेहनत करून यश कमावलं. दोघांनाही सुरुवातीच्या चांगल्या प्रसिद्धीने प्रकाशझोतात ठेवले.