Team India Middle Order: श्रेयस, राहुल आणि पंतमध्ये जागेसाठी चुरस; टीम इंडियाच्या मधल्या फळीत नवा पेच

Shreyas, Rahul and Pant locked in intense battle for one spot : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी श्रेयस अय्यर, के. एल. राहुल आणि रिषभ पंत यांच्यात मोठी चुरस असून आगामी आयपीएल मोसम त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
Vision 2027: Coach Gautam Gambhir's Blueprint for ODI World Cup

Vision 2027: Coach Gautam Gambhir's Blueprint for ODI World Cup

esakal

Updated on

जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com

भारताचे टी-२० विश्‍वकरंडक विजेतेपद राखण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता २०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आयपीएलच्या अखेरीस एकदिवसीय विश्‍वकरंडकाचा आराखडा तयार असेल, असे स्पष्ट करीत याबाबतचे संकेत दिले आहेत. टी-२० विश्‍वकरंडकाचे जेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघात बदल होतील का, असा प्रश्‍न या वेळी उभा ठाकला आहे. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येत असताना श्रेयस अय्यर, के. एल. राहुल व रिषभ पंत या तीन खेळाडूंसाठी आयपीएलचा मोसम अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com