

Indian Cricket Review 2025
esakal
२०२५ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी यशाच्या शिखरावर नेणारे तसेच पिछेहाटही करणारे आणि स्टार कल्चरला पूर्णविरामही देणारे ठरले. महिलांनी मात्र प्रथमच विश्वकरंडक जिंकून घेतलेली गगनभरारी नवा इतिहास रचणारी ठरली.
कोणत्याही वर्षाची सुरुवात होते तेव्हा नवनवे संकल्प तयार केले जातात. ध्येय आणि उद्दिष्टही निश्चित केली जातात, अशा इच्छा अपेक्षा कमी-जास्त प्रमाणात पूर्णही होत असतात; पण कधी कधी जानेवारीत सुरू झालेला प्रवास डिसेंबर संपता संपता वेगळ्याच वळणावर गेलेला असतो आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून पाहिल्यावर काय ठरवले, काय झाले, असा गूढ प्रश्न निर्माण होतो तेव्हा मन काहीसे दुःखी झालेले असते; पण जे मिळाले त्यात अधिक वाढ करण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या आणि पुढच्या वर्षाचा संकल्प नव्याने तयार करणाऱ्या लढवय्यास योद्धा समजला जातो. हे तत्त्व केवळ खेळाबाबतच नव्हे तर सर्वसामान्य जीवनासही लागू पडते.