
सारंग खानापूरकर - editor@esakal.com
आपल्या भूमीचे प्राणपणाने संरक्षण करणे, ही भारतीयांची मनोवृत्ती आहे. दुसऱ्यांवर आक्रमण करून भूमिविस्तार करणे, हे आपले धोरण नाही. हे एका चांगल्या स्वभावाचे लक्षण असले, तरी त्याचा प्रचंड प्रभाव आपल्या लष्करी आणि राजकीय धोरणांवर पडला असल्याने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि चीनबरोबर झालेल्या युद्धांमध्ये भारताने वर्चस्वाच्या अनेक संधी गमावल्या असल्याचे किरण गोखले यांनी ‘स्वतंत्र भारताची सहा युद्धे’ या पुस्तकात म्हटले आहे. भारताने कायम शूरवीरांचा गौरव केला आहे. मात्र, केवळ याच भावनेच्या चौकटीत अडकत भारतीयांनी सांघिक शौर्याकडे दुर्लक्ष करत केवळ वैयक्तिक धाडसाला महत्त्व दिल्याने देशाचे मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष गोखले यांनी काढला आहे.