राजा रवी वर्मा नसते तर देवी-देवता तर असते, मात्र ते कसे दिसले असते हे सांगणं कठीण

राजा रवी वर्मा नसते तर देवी-देवता तर असते, मात्र ते कसे दिसले असते हे सांगणं कठीण

असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्यांनी जगाला दिलेल्या मूल्यांवर किंवा जगाला दिलेल्या वारशावर अवलंबून असते. सामान्य माणसांना असं वाटलं की समोरची व्यक्ती आपल्याशी जोडली गेली नसती तर आपलं आयुष्य जरा कमी चांगलं असतं, तर समजून चला की ती केवळ साधीसुधी व्यक्ती नसून तिचं वेगळं स्थान आहे. राजा रवी वर्मा त्यातीलच एक व्यक्ती. नावात जरी राजा असलं तरीही त्यांच्याकडे ना कोणतं राज्य होतं ना कोणती जमीन. रवी वर्मा यांना ती पदवी तत्कालीन व्हायसरॉय यांनी त्यांची प्रतिभा वाढवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दिली होती. 

त्यावेळी इंटरनेट, सोशल मीडिया नव्हतं, तरीही घराघरातील प्रत्येक व्यक्ती ही राजा रवी वर्मा यांना ओळखत असे. एकीकडे त्यांना अपार लोकप्रियता मिळत होती त्याचबरोबर दुसरीकडे त्यांना नावं ठेवणाऱ्यांचीही काही कमी नव्हती. मात्र राजा रवी वर्मा यांची कल्पनाशीलता या सर्वांच्या पलीकडची होती. रवी वर्मा यांनी चित्रकलेत असे प्रयोग केलेत जे त्याआधी कुणीही केलेलं नव्हते आणि म्हणूनच त्यांची चित्रकारिता त्यांना अनेक नवनव्या उंचीवर घेऊन गेली.  

आज घरात देवी देवतांचे फोटो, त्यांच्या तसबिरी असणं फार कॉमन आहे. मात्र आजपासून तब्बल सव्वाशे वर्ष आधी अशी परिस्थिती नव्हती. तेंव्हा केवळ देवळांमध्येच देवी देवतांच्या मूर्ती असायच्या, सोबतच जात धर्म या सर्व गोष्टीही होत्या. आज आपल्याला जे कॅलेंडर, वह्या किंवा पुस्तकांमध्ये देवी देवतांचे फोटो पाहायला मिळतायत ते राजा रवी वर्मा यांच्यामुळे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे 

महत्त्वाचं योगदान : 

केरळातील किलिमानूरमध्ये जन्मलेले रवी वर्मा त्यांचे काका चित्रकार होते. असं म्हणतात की रवी वर्मा यांना त्यांच्या काकांमुळेच चित्रकारितेची आवड निर्माण झाली. रवी वर्मा चौदा वर्षांचे असताना त्यांच्या काकांना रवी वर्मांमधील चित्रकलेची चमक ओळखली. त्यानंतर त्यांनी रवी यांना त्रावणकोर महालात चित्रकला शिकवायला नेलं. त्यावेळी त्रावणकोर महालातील वॉटर पेंटींगचे महारथी रामस्वानी नायडू यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवलेत. लवकरच रवी वर्मा चित्रकलेत निष्णात झाले. 

खरंतर रवी वर्मा यांची ओळख निर्माण झाली ती त्यांच्या प्रसिद्ध तैलरंगाच्या पेंटिंगमुळे, चिंत्रांमुळे. त्यांचे अनेक नावाजलेले पेंटीग्स हे ऑइल पेंटमध्येच रंगवलेले आहेत. त्याची कारणं म्हणजे एकतर तैल रंगांनी चित्राचा रंग उजळून दिसतो आणि अनेक वर्ष अशी चित्र सांभाळून ठेवणं सोपं होतं. त्यांना नाव ठेवणारे देखील त्यांच्या चित्रांची मात्र तारीफ करत. रवी वर्मा यांच्यासारखे चित्रकार देशात झालेला नाही असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. 
 
रवी वर्मा साधारण २० वर्षांचे होते तेंव्हा नेदरलँडमधून नावाजलेले चित्रकार थियोडोर जेन्सन भारतात आले होते. विदेशी चित्रकार मुख्यत्वे ऑइल पेंटीग्स करत असत. भारतात या शैलीबाबत फार माहिती नव्हती. खरंतर असं म्हणतात की तैलरंगांचा वापर करून चित्र रंगवण्याची पद्धत भारत आणि चीनमध्येच सुरु झाली. मात्र तेंव्हा ती भारतात जास्त प्रसिद्ध नव्हती. ही पद्धत कुठल्यातरी मार्गाने ग्रीसमध्ये पोहोचली. १५ व्या शतकात चित्रकलेची ही शैली युरोपात प्रसिद्ध झाली. या शैलीला पुन्हा भारतात येण्यास १९ व शतक उजाडलं. रवी वर्मा यांनी चित्रकार थियोडोर जेन्सन यांच्याकडून तैलरंगाच्या चित्रकलेचे केवळ धडे घेतले नाहीत तर त्यामध्ये महारत देखील मिळवली. भारतात तैलरंगाच्या चित्रांना प्रसिद्ध करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. 

परदेशी चित्रकार तैलरंगाचे पेंटीग्स बनवत असतं. तिपाईवर कॅनव्हास ठेऊन ते चित्र रेखाटत असतं. त्यांचा कॅनव्हास हा ज्यूटचा असायचा. भारतात ही पद्धत कुणालाही ठाऊक नव्हती. राजा रवी वर्मा यांनी युरोपियन चित्रकारांकडून ही पद्धती शिकली आणि भारतात तिचा प्रसार केला.  

चित्रकार थियोडोर जेन्सन यांच्याकडूनच रवी वर्मा यांनी पोट्रेट बनवण्याची कला शिकली. पोट्रेट म्हणजे आपल्या आसपासच्या कोणत्याही गोष्टीला समोर ठेवून किंवा बसवून त्याचं चित्र रेखाटलं जायचं. चित्रकार थियोडोर जेन्सन त्यावेळी पोट्रेट बनवण्यासाठी साऱ्या जगात ओळखले जायचे. त्यानंतर रवी वर्मा यांचीही पोट्रेट बनवण्यात नाव कमावलं. रवी वर्मा यांच्या लोकप्रियतेमुळे त्यावेळचे अनेक राजा महाराजा रवी वर्मा यांच्याकडे स्वतःचं पोट्रेट बनवण्यासाठी लाईन लावत असत. रवी वर्मा हे राजांकडून त्यांच्या पोट्रेटसाठी बक्कळ मोबदला देखील घेत असल्याचं बोललं जातं. रवी वर्मा यांनी महाराणाप्रताप यांचं बनवलेलं पोट्रेट हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. 

देवी देवतांना आपला विषय बनवलं 

आपलं चित्रकलेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर रवी वर्मा यांना त्यांच्या चित्रांचा विषय सुचत नव्हता. त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केलं, अनेक ठिकाणी फिरलेत आणि भारताची आत्मा समजण्याचा प्रयत्न केला. खूप फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारताची आत्मा म्हणजे भारताची महाकाव्य आणि भारतीय ग्रंथ. त्यांनी ठरवलं की या ग्रंथांमधील चरित्रांवर आधारित पेंटिंग्स आपण काढले पाहिजेत. रवी वर्मा यांनी अनेक पौराणिक कथांमधील पात्रांना आपल्या चित्रातून कॅनव्हासवर उतरवलं. त्यांनी अनेकदा दक्षिण भारतीय सुंदर स्त्रियांवर हिंदू देवींची चित्रं दर्शवलीत. 

रवी वर्मा असे चित्रकार होते ज्यांनी पहिल्यांदा हिंदू देवी देवतांना सामान्य माणसांसारखं दाखवलं. आज आपण पोस्टर्स किंवा कॅलेंडरवर माता सरस्वती, माता  लक्ष्मी, दुर्गा माता, राधा मय्या किंवा श्रीकृष्णाचे जे फोटो पाहतो ते फोटो राजा रवी वर्मा यांचीच कल्पनाशक्ती आहे. ज्या देवी देवतांची आज आपण प्रार्थना करतो, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या देवी देवतांचे फोट आज आहेत त्यांना कदाचित हे ठाऊक नसेल.  त्यांच्या सर्वात फेमस चित्रांमध्ये देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांची चित्र आहेत. त्यांची अनेक चित्र आजही बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये सुरक्षित आहेत. विचारात मग्न असलेली युवती, दमयंती-हंसा यांचं संभाषण, संगीत सभा, अर्जुन आणि सुभद्रा, विरहाने व्याकुळ झालेली युवती, शकुंतला, रावनाद्वारा केला गेलेला जटायु वध, इंद्रजीत-विजय, नायर जातीची स्त्री, द्रौपदी कीचक, राजा शांतनु आणि मत्स्यगंधा, शकुंतला आणि राजा दुष्यंत ही त्यांची काही प्रसिद्ध चित्रं आहेत. 

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेस सुरु केली : 

राजा रवी वर्मा यांच्या चित्रण प्रचंड मागणी होती. म्हणून त्यांनी एक प्रेस देखील सुरु केली. १८९४ मध्ये त्यांनी मुंबईत कलर लिथोग्राफिक प्रेस खरेदी करून मुंबईत थाटली आणि आपल्या चित्रांच्या विविध कॉपीज काढून त्यांनी त्यांची विक्री झुरू केली. या पूर्वी कोणत्याही चित्रकाराने असं केलेलं नव्हतं.  त्यांना या व्यवसायातून फार फायदा नाही झाला. मात्र समाजातील  ज्यांना देवळात जाऊ दिलं जात नव्हतं त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेत. मात्र अनेकांना तेही पचण्यासारखं नव्हतं.  

दादासाहेब फाळकेंचं वाढवलं मनोधैर्य 

दादासाहेब फाळके यांनी गुजरातमधील गोद्रामधून एक फोटोग्राफर म्हणून सुरवात केलेली. त्यानंतर ते बडोद्यात आलेत. तिथे त्यांनी पेंटींग आणि फोटोग्राफीबद्दल शिक्षण घेतलं. त्यानायर राजा रवी वर्मा यांनी स्वतःची प्रेस उघडली तेंव्हा त्यांना तिथे नोकरी मिळाली. त्यांचा आणि रवी वर्मा यांचा परिचय तेंव्हाचाच. या निमित्ताने दोघेही एकमेकांना आधी ओळखू लागलेत. रवी वर्मा यांनी दादासाहेब फाळके यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना प्रोत्साहित केलं. अनेकजण असंही म्हणतात की रवी वर्मा यांनी त्यांची प्रेस विकल्यानंतर आलेले पैसे दादासाहेब फाळके यांना दिले होते अंडी दादासाहेब फाळके यांनी तेच पैसे आपल्या कामात लावले. 

राजा रवी वर्मा २ ऑक्टोबर १९६० मध्ये निवर्तलेत. त्यांच्या जाण्याचा तब्बल सात वर्षानंतर दादासाहेब फाळके यांनी त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला. तेंव्हापासून भारतीय सिने सृष्टीची सुरवात झाली. त्यांच्या जाण्याच्या तब्बल शतकानंतर आता बॉलिवूडमध्ये वर्षाला तब्बल दोनहजार सिनेमे बनतात. त्यामुळे असं म्हंटल जातं की तेंव्हा राजा रवी वर्मा यांनी दादासाहेब फाळके यांची मदत केली नसती तर आज एवढे चित्रपट बानू शकले असते का? भारतीय सिनेमाचे जनक म्हणून कदाचित आज कुणा दुसऱ्याची इतिहासात नोंद असती. 

राजा रवी वर्मा आणि विवाद काही नवीन नाही : 

राजा रवी वर्मा यांनाही मोठ्या प्रमाणात आलोचना सहन करावी लागली. मकबूल फिदा हुसैन यांनी ज्याप्रकारे समाजाची आलोचना सहन केली तसंच काहीसं राजा रवी वर्मा यांच्यासोबतच्या झालं. अर्थात तो १२५ वर्ष जुना भारत होता. त्यांच्यावर आरोप होते ते, उर्वशी, रंभा यांच्यासारख्या अप्सरांचे अर्धनग्न चित्र रेखाटण्याचे. अनेकांनी याला हिंदू धर्माचा अपमान म्हंटल. देशात विविध ठिकाणी त्यांच्यावर केसेसही झाल्यात, ज्यामध्ये राजा रवी वर्मा यांचं आर्थिक नुकसानही झालं. सोबतच त्यांना मानसिक त्रासाचाही सामना करावा लागला. असं म्हणतात की मुंबईत असलेली त्यांची प्रेस देखील जाळण्यात आलेली. त्यात केवळ प्रेसचं साहित्य नाही तर अनेक बहुमूल्य चित्र आणि पोट्रेट देखील भस्मसात झालेत. अनेकजण या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना या व्यवसायात घाटा झाल्याने त्यांनी एका जर्मन चित्रकाराला आपली प्रेस विकल्याचे बोललं जातं.

राजा रवी वर्मा यांच्यावर असाही आरोप लावण्यात आला की देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांच्या चित्रातील फोट हे त्यांची प्रेमिका सुगंधाशी मिळते जुळते होते. लोक असं म्हणतात की  रवी वर्मा आपल्या चित्रकलेसाठी सुगंधाची मदत घेत असत. सुगंधा नामक मुलीला कुणा वैश्येची मुलगीगी मानलं गेलं. अनेकांनी या विषयावरून हिंदू धर्माला अपवित्र करण्याचा आरोपही त्यांच्यावर लावला. यावरूनही त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला.

राजा रवी वर्मा यांना त्यांच्या वयाच्या ५६ व्य वर्षी त्यावेळचा देशातील सर्वात मोठा सन्मान ' केसर-ए-हिंद' देण्यात आला. हा सन्मान म्हणजे आजचा भारतरत्न असा मानला जातो. हा सन्मान पटकावणारे राजा रवी वर्मा पहिले कलाकार होते. 

( संदर्भ - सत्याग्रह - हिंदी )

inside story of raja ravi varma and his life as greatest painter in indian art

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com