esakal | Women's day 2021 : गृहिणी ते गृहलक्ष्मी
sakal

बोलून बातमी शोधा

Preeti_Kucheria

शिकण्याला वयाची अट नसते. फक्त शिकण्याबाबत जिज्ञासा हवी.

Women's day 2021 : गृहिणी ते गृहलक्ष्मी

sakal_logo
By
मुकुंद लेले

Women's day 2021 : घराचं दैनंदिन व्यवस्थापन अगदी उत्तमरित्या सांभाळणारी ‘गृहिणी’ जेव्हा खऱ्या अर्थाने ‘गृहलक्ष्मी’ होते, तेव्हा काय फरक पडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईच्या प्रीती कुचेरिया! तब्बल १५ वर्षे फक्त गृहिणी म्हणून काम सांभाळणाऱ्या प्रीती यांनी स्वकर्तृत्वावर विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केले आहे. काहीशा किचकट समजल्या जाणाऱ्या आर्थिक सेवा क्षेत्रात त्यांनी प्रवेश करण्याचे धाडस केले आणि अभ्यासू वृत्तीने यातील अनेक कौशल्ये आत्मसात केली.

विमा हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र असले तरी त्या ‘ॲम्फी’ रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरदेखील आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमा जगतात नामवंत व्याख्यात्या म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. विमा विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) या विमा व्यावसायिकांच्या जागतिक संस्थेच्या त्या गेली २० वर्षे सभासद आहेत.

Women's day 2021 : सोशल मीडियावर कसा आहे महिला आमदारांचा वावर? जाणून घ्या​

याशिवाय ‘कोर्ट ऑफ द टेबल’ (सीओटी) आणि ‘टॉप ऑफ द टेबल’ (टीओटी) या सन्मानाच्या त्या अनेकदा मानकरी ठरलेल्या आहेत. आयसीआयसीआय प्रुडेशियल लाईफ इन्शुरन्सच्या त्या सलग तीन वर्षे आघाडीच्या (क्र. १) विमा सल्लागार आहेत. या क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा लौकीक सातासमुद्रापार पोचला आहे. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने निवडण्यात आलेल्या आर्थिक क्षेत्रातील ‘टॉप १००’ महिलांमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळालं आहे.

‘‘शिकण्याला वयाची अट नसते. फक्त शिकण्याबाबत जिज्ञासा हवी. गृहिणी जेव्हा आपल्या घरी प्रत्यक्ष ‘लक्ष्मी’ आणते, तेव्हा घरातले वातावरणच बदलते, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यातूनच एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो,’’ असे त्या म्हणतात. प्रीती कुचेरिया यांची ही यशकथा तमाम गृहिणींना प्रेरणादायी आहे.

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image