Yoga For Kids : गोष्टी, खेळ आणि योगातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा मंत्र

International Yoga Day : ‘योग फॉर किड्स’ हे पुस्तक मुलांना गोष्टी, खेळ, संवाद आणि प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून योगाची ओळख करून देत आरोग्यदायी जीवनशैलीकडे सहजपणे वळवते.
International Yoga Day

International Yoga Day

esakal

Updated on

मनोज पटवर्धन - saptarang@esakal.com

आज बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून). दर वर्षी जगातल्या १८० हून अधिक देशांतील योगप्रेमी योगासने करून हा दिवस साजरा करतात. आरोग्य, चैतन्य आणि आनंदाने परिपूर्ण व समृद्ध आयुष्य जगायचे असेल, तर त्यासाठी ‘योग ही एकमेव आदर्श जीवनशैली आहे’ हे आता सर्वांना मनापासून पटले आहे. याच योगशास्त्राचे बीज मुलांच्या मनात लहानपणीच कसे रुजवता येईल, त्यांना योगासनांच्या सरावाकडे कसे वळवता येईल, याविषयी शिक्षक, पालक गांभीर्याने विचार करताना दिसतात.

काळाची ही गरज ओळखून ‘योग फॉर किड्स’ हे पुस्तक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. भूषण पटवर्धन यांनी सहज, सोप्या इंग्रजीत लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी आणि हिंदी भाषेतील अनुवादही उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून अतिशय सुंदर पुस्तक सकाळ प्रकाशनाने योगप्रेमी पालकांना उपलब्ध करून दिले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच पटवर्धन यांनी पुस्तकामागील त्यांची भूमिका मांडली आहे. ती लक्षात घेऊनच पुढे त्यांच्या सहलेखिका ईहा कुलकर्णी यांनी मांडणी केल्याचे दिसते.

मुलांचे भाबडे, निष्पाप, निरागस जग योगासाठी अगदी अनुकूल असते. हे लक्षात घेऊनच या पुस्तकाची भाषा मुलांच्या मानसिकतेला अनुसरून सोपी, साधी व तरीही प्रभावी अशीच असल्याचे जाणवते. महत्त्वाचे म्हणजे, पुस्तक सहज-सोपे करताना योगशास्त्रातल्या संकल्पनांशी सुसंगतता राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे जाणवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com