Premium|Stock market forecast 2025 : शेअर बाजाराची धडधड वाढली; अमेरिकेतील हालचाली आणि रुपयाची घसरण; येत्या वर्षात काय असेल गुंतवणुकीचे गणित?

Global economic trends : २०२५ मधील आर्थिक आशावाद आणि जागतिक धोक्यांचा विचार करता गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेणे आणि बाजारातील अनिश्चिततेचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
Stock market forecast 2025

Stock market forecast 2025

esakal

Updated on

हर्ष काबरा

येत्या वर्षातील आर्थिक आशा, धोके आणि संभाव्य उलथापालथी या सगळ्याचा गुंतवणूकदारांनी अभ्यास करणे आवश्‍यक आहे. जगभर लक्ष ठेवून सावधानता बाळगणे हाच उपाय आहे. बँका आणि गुंतवणूक संस्थांच्या अंदाजांवर आधारित संभाव्य परिस्थितीचे विश्‍लेषण.

व र्ष २०२५ सरताना गुंतवणूक विश्‍वातील अनेकांकडून ‘भविष्यवाणी’ ऐकू येण्याचे दिवस सुरू आहेत. बँका आणि गुंतवणूक संस्थांचे धोरणकर्ते सध्या यातच गुंतलेत. त्यांपैकी अनेकांच्यात एक अल्लड आशावाद दिसतो. अर्थव्यवस्था वाढेल, चलनवाढ आटोक्यात राहील, २०२६ मध्ये समभागांचे दर नवीन उच्चांक गाठतील... बहुतेक तज्ज्ञांच्या मते भविष्य उजळ आहे. मात्र यामुळे २०१९ ची आठवण डोकावते. त्या वर्षाच्या अखेरीससुद्धा असाच आशावाद होता. मग अनपेक्षितरित्या कोरोना आला. सर्व अंदाज सपशेल फसले. तसे धोके नेहमीच असतात. काही छुपे, तर काही प्रकट. काही तज्ज्ञ ते कबूल करतात. एक जरी उलटा घाव बसला, एक जरी धोका प्रत्यक्षात उतरला, तर बाजाराची सोनसळी चमक क्षणात काळवंडू शकते.

आपला शेअरबाजार इतर शेअरबाजारांप्रमाणेच आहे. जगात कुठेही वारे फिरले की आपल्याकडे पानगळ सुरू होते. अमेरिकेत एखादी भुवई उंचावली की दलाल स्ट्रीटवर धडधड वाढते. हा चालू महिनाच पाहिला, तर परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेल्या विक्रीचा दबाव, रुपयाचे अवमूल्यन व त्यामुळे वाढलेला आयातखर्च, तसेच जागतिक बाजारातील संमिश्र संकेत यांमुळे भारतीय शेअर बाजार प्रामुख्याने मर्यादित चौकटीतच हालचाल करत राहिला आहे. त्यामुळे काही जागतिक धोके आणि सावधानतेच्या इशाऱ्यांकडे अधिकच लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com