Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Jayasri Burman Artistic Journey : जयश्री बर्मन यांच्या चित्रांमध्ये पुराणकथा, दैनंदिन जीवन आणि निसर्ग यांचे सुंदर चित्रण दिसते. तीन दशकांच्या कलाप्रवासात त्यांच्या कलाकृतींना देश-विदेशात मान्यता मिळाली आहे.
Jayasri Burman Paintings

Jayasri Burman Paintings

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

जयश्री बर्मन यांच्यासाठी पेंटिंग ही कधीही पळवाट नव्हती, तर त्या सौंदर्याकडे सतत निर्देश करत असतात. पुराणकथा, दैनंदिन जीवन यांना सौंदर्यशाली रूप, पुनरुज्जीवन आणि सहनशीलता हे आहे.

जयश्री बर्मन यांच्यासाठी पेंटिंग ही खडतर जीवनापासून पळवाट नव्हती तर पुराणकथा, दैनंदिन जीवन यांना सौंदर्यशाली रूप, पुनरुज्जीवन आणि सहनशीलता हे आहे. प्रथमदर्शनी जयश्री बर्मन यांच्या कलाकृती या मंत्रमुग्ध करणाऱ्या मौजमजेच्या वाटतात. स्वप्नवत प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या, झाडावर किलबिल करणारे पक्षी, फुलझाडे, निसर्गाशी एकरूप होणाऱ्या ललना आणि देवता या उजळ दिसतात. त्यांचे रंग झगझगीत असतात आणि त्यातील भाववृत्ती समाधानी दिसते.

परंतु त्यांच्यासोबत काही वेळ बोललात तर वेगळीच गोष्ट ध्यानात येते. त्या तेजस्वी चित्रांमागे फक्त कल्पनेचा खेळ नाही तर विलक्षण चिकाटी आहे. त्या नाट्यमय न होता त्यांना आलेल्या अडथळ्यासंबंधी बोलतात. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल बोलताना प्रौढीचा वास नसतो. त्यात त्यांच्या कामाबद्दल आत्मविश्वास दिसतो. जयश्री बर्मन यांचे आजच्या कलावंतामध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते. गेल्या तीसएक वर्षांत त्यांची पेंटिंग ही देश-परदेशात सर्वत्र प्रदर्शित झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या म्युझियममध्ये आणि कलासंग्रहात यांचा समावेश आहे. जर्मनीतल्या मानाच्या बीएनालमध्ये त्यांची चित्रे मांडली गेली आहेत. त्यांना त्यांच्या कलाप्रवासात सुरुवातीलाच केंद्र सरकारचा मानाचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यानंतर त्या राष्ट्रपती भवनमध्ये निवासी कलावंत म्हणून निवडल्या गेल्या. त्यांच्या कल्पनांची भरारी आर्ट गॅलरींच्या पलीकडे पोचली आहे. त्यांना केंद्र सरकारच्या पोस्टल स्टॅम्पचे काम करता आले आहे आणि इतरत्रही सार्वजनिक ठिकाणाचे काम त्यांनी केले. त्यांची चित्रे म्युझियममध्ये जशी उठून दिसतात, तशीच आघाडीच्या उद्योजकांच्या आणि संग्राहकांच्या आणि विख्यात व्यक्तींच्या संग्रहांतही. असे असूनही त्यांच्याशी बोलताना या उपलब्धींचा क्वचित उल्लेख होतो. त्याऐवजी त्या आपल्या कामाबद्दलच बोलतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com