हिमालय पर्वताचा उल्लेख प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत पवित्र आणि महत्त्वाच्या स्थळाच्या रूपात केला जातो. याच हिमालयामध्ये असलेल्या हिमनद्या म्हणजे भारत त्याचबरोबर आशिया खंडाच्या जीवनरेखेचा पाया. या हिमनद्या केवळ हिमाचे प्रचंड साठे नसून, त्या गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र आणि सिंधू यांसारख्या महानद्या निर्माण करतात.