

Marathi poetry book, Saptarnag
Sakal
- सुनीता टिल्लू, editor@esakal.com
हृद्य शब्दांत मांडलेली जिवलगांची स्मरणयात्रा
सुप्रसिद्ध कवी हेमंत जोगळेकर यांचे ‘जीवीचे जिवलग’ हे लेखसंग्रहपर पुस्तक वाचकांच्या भेटीस आले आहे. अर्धशतकाच्या लेखनवाटचालीत मराठी साहित्यविश्वातील अनेक दिग्गज व्यक्ती विविध नात्यांनी जोगळेकरांच्या आयुष्यात आल्या - वडीलधारे म्हणून, सन्मित्र म्हणून, पथदर्शक म्हणून, प्रस्तावनाकार, समीक्षक, संपादक, प्रकाशक आणि चाहते म्हणूनही. या लेखनप्रवासात त्या व्यक्ती जोगळेकरांच्या जीवाच्या जवळच्या झाल्या. त्या व्यक्तींचे कृतज्ञ स्मरण करणारे २७ लेख प्रस्तुत पुस्तकात संग्रहित केले आहेत.