
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
‘जंगलवाचन’ हा पर्यटनातील सर्वांत समृद्ध आणि अभिजात प्रकार ठरावा. असे म्हणतात, की जंगले म्हणजे पृथ्वीची फुप्फुसेच. जंगलाची परिसंस्था अनुभवण्यासारखे दुसरे सुख नाही. असाच अनुभव पुणे जिल्ह्यात येणाऱ्या मावळ तालुक्यातील आजिवली गावात घेता येतो.