Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

Vedic Astrology and Planet Movement : अधिक मासातील गुरूचे नक्षत्र भ्रमण मानवी मनाला वैश्विक कनेक्टिव्हिटी साधून देणारे आहे. आजच्या संगणकीय युगातील व्हायरस आणि सायबर क्राईमच्या तुलनेत मनाच्या उन्मनी अवस्थेतील 'राउटरविना कनेक्टिव्हिटी' अधिक श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन.
Adhik Maas Guru Pushya Amrit Yog

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog

esakal

Updated on

श्रीराम भट - saptrang@esakal.com

सध्याच्या अधिक मासातील गुरूचे होणारे भ्रमण किंवा त्याची होणारी वाटचाल मोठी अलौकिक राहणार आहे. पुनर्वसू नक्षत्रातून आणि पुढे पुष्य नक्षत्रातून होणारे हे अधिक मासातील गरूचे भ्रमण नक्षत्रलोकांतून कनेक्टिव्हिटी साधून देणारेच राहील. अर्थातच गीतेचे मर्म जाणणाऱ्या श्रद्धावंतांनाच. सध्याच्या भयाण कलियुगात माणसाचे घरी आणि दारी भावपर्यावरण सतत बिघडत असते. अर्थातच आपल्या या महान देशातील राजकारणासारखेच. माणसाचे सध्याचे भावनिक अँटिने सध्याच्या अतिप्रसिद्ध संगणकीय युगात भलतीकडेच रोखलेले पाहायला मिळतात आणि मग त्यातून माणसाच्या भावजीवनाला किंवा त्याच्या अंतःकरणाला हा संगणकीय व्हायरस पूर्णपणे व्यापून टाकत असतो. पूर्वी परदेशी फोन करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत असे. परंतु ही सध्याची संगणकीय कनेक्टिव्हिटी रात्रोअपरात्री बिछान्यातच वादळासारखी कार्यरत असते!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com