
कनी कुस्रुती या अभिनेत्रीसाठी २०२४ हे वर्ष निर्विवादपणे दमदार ठरलं. पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’च्या निमित्ताने त्या सिनेमासोबतच या अभिनेत्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौतुक लाभले. यासोबत ‘पोचर’, ‘किलर सूप’सारख्या मालिकांमधील तिच्या सहाय्यक भूमिका तर रोचक होत्याच. त्यामुळे तिच्या भूमिकांनी (व संबंधित कलाकृतींनी) खऱ्या अर्थाने माध्यम, संस्कृती, देशांच्या सीमारेषा ओलांडल्या, असे म्हणता येते. या यादीतलाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे शुची तलाती दिग्दर्शित ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’.