

How the Tale Blends Culture, Food, and Fun
Sakal
गौरी देशपांडे gaurisdeshpande1294@gmail.com
मायबोलीपलीकडची अक्षरे
‘‘नाझनीन!’’
मकबूल बट्टनं घरात शिरल्याबरोबर बायकोला हाक मारली. नाझनीन गडबडीने बाहेर आली. तिच्या कानातले - लांब चांदीचे झुमके रुणझुणत होते. ती आत त्यांच्या मुलांना - फिरदोस आणि फाहिमाला झोपवत होती. तलावाकाठी मकबूल आणि त्याच्या कुटुंबाचं लहानसं लाकडी घर होतं. तलावाच्या काठी भव्य चिनार वृक्ष तलावाच्या पाण्यात प्रेमळपणे बघत उभे होते. आज मकबूलला घरी यायला फारच उशीर झाला होता. त्याची हाक ऐकून नुकतीच झोपलेली मुलं डोळे चोळत चोळत बाहेर आली. त्याने अर्धवट झोपेत असलेल्या आपल्या मुलांना प्रेमानं जवळ घेतलं.