

Kautilya Arthashastra
esakal
श्रीराम कुंटे kunteshreeram@gmail.com
जागतिक भू-राजकारणावर सर्वांत जास्त प्रभाव पाडणाऱ्या काही विचारवंतांबद्दल आज आपण जाणून घेऊ या. तसं केल्याने या ज्ञानशाखेची मूलभूत तत्त्वं काय आहेत, त्यातले महत्त्वाचे सिद्धांत कोणते, यांसारख्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. भारतात कधीही राजकीय आणि भू-राजकीय तत्त्वज्ञानाची आखणी झाली नाही असं आपल्याला आपल्या न्यूनगंडामुळे वाटत असतं. पण हे शक्य आहे का, याचा विचार करा. पाश्चात्त्य संस्कृती रांगत होत्या त्या वेळी आपली संस्कृती पूर्ण भरात होती. आपल्याकडे मोठमोठी साम्राज्यं, नियोजनबद्ध शहरं होती.