

Khanderi Island Fort
esakal
१६७२मधील निष्फळ प्रयत्नानंतर शिवाजी महाराजांनी १६७९मध्ये खांदेरी बेटावर जलदुर्ग उभारणीचे कार्य नव्या रणनीतीसह राजकीय सावधानतेने आरंभिले. त्यावेळी सिद्धीचे आरमार सूरतेत हिवाळा काढत असल्याने आणि मध्य पावसाळ्याचा नैसर्गिक आडोसा उपलब्ध असल्यामुळे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या हस्तक्षेपाचा संभव तुलनेने कमी राहील, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. चौल येथे मराठ्यांचे मनुष्यबळ आणि साहित्य एकवटत असल्याची माहिती मुंबईत पोहोचताच इंग्रज प्रशासनाच्या चिंतेची पातळी वाढली. सुमारे २७ ऑगस्टला मिळालेल्या या वार्तेनंतर त्यांनी खांदेरीवरील मराठ्यांनी चालविलेल्या दुर्गबांधणीच्या प्रयत्नांना पायबंद घालण्याचे नियोजन सुरू केले.