
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
आता प्रत्येक वेळी पिंपळाच्या झाडाखाली बसल्यावर येल्लय्या आकाशाकडे टक लावून दुसरा कोरिका कधी मिळतोय याची वाट पाहतो. हो! कारण पहिला कोरिका त्याला पिंपळाच्या झाडाखाली राजम्माजवळ असतानाच मिळाला होता ना! एक मिनिट! कोरिका? म्हणजे? आणि येल्लय्या हे असं कसं नाव? सांगते, सांगते! तेलगू भाषेत ‘कोरिका’ म्हणजे ‘इच्छा’!