

Memories of Lata and Asha
esakal
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जयंतीदिनी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान व ‘सकाळ माध्यम समुहा’च्या वतीने ‘लतादीदी ..आशाताई’ हा संगीतमय कार्यक्रम आज (रविवारी) पुण्यात होत असून याच कार्यक्रमात लता मंगेशकर व आशा भोसले पुरस्काराचे वितरण होणार आहे. यानिमित्ताने पंडितजींनी आपल्या दोन्ही बहिणींच्या आठवणींना दिलेला उजाळा...
दिवा लावायला गेलो, तो प्रकाशच हाती आला.
तंबोरा मिळवायला बसलो, तो स्वरच हाती आले.
दीदीकडे बंदिश शिकायला बसलो, तो,
स्वरमाउलीच हाती आली.
आणि शिव शिवाही हाती आले.
शिव हे पुरुषवाचक,
आणि शिवा हे स्त्रीवाचक. असं अद्वैतच !
देवीने अंगाची आटणी करून,
आपल्या पतीचा उदय केला.
पतीने आपल्या अंगाचा संकोच करून,
आपल्या पत्नीची प्राणप्रतिष्ठा केली.
वाऱ्याबरोबर वाऱ्याची गती.
सोन्याबरोबर सोन्याची झळाळी,
तशी शक्त्ती मध्ये शिव आणि शिवातच शक्ती.
हा शिव-शिवा, अ-ऊ-म- रूपी ओंकारावर
आरूढ झाली.
आणि एखादी गर्भरेशमी, बुट्टेदार पैठणी
उलगडावी, त्या प्रमाणे हे विश्व उलगडले.