

Marathi New Books
esakal
लेखक संजय सपकाळे यांनी आपल्या लेखणीतून मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारी ही कादंबरी लिहिली आहे. या कथेतील पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबाचा ‘आनंदवन’ हा वाडा केवळ विटा-मातीचा नसून, तो नैतिकतेचा एक अभेद्य गड आहे. पण, आधुनिकतेच्या नावाखाली जेव्हा भ्रष्टविचार घराच्या उंबरठ्यात शिरतो, तेव्हा सुरू होतो भीषण संघर्ष! क्षणभंगुर सुखाच्या मोहापायी भरकटलेला ‘नितीन’, वाड्याच्या अस्मितेसाठी लढणारे ‘आबा’ आणि डिजिटल युगातील ‘हनी ट्रॅप’सारख्या अदृश्य शत्रूशी दोन हात करणारी ‘रिया’... ही केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर आजच्या बदलत्या सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे.
प्रकाशक : जयप्रभा पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १००,
मूल्य : २०० रु.