Asian and Olympic Games
sakal
- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय खेळाडूंनी बॉक्सिंग, तिरंदाजी व नेमबाजी या आशियाई व ऑलिंपिकमधील खेळांच्या महत्त्वाच्या अन् प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. या स्पर्धांमधील कामगिरीचा भारतीय खेळाडूंना २०२६मधील आशियाई स्पर्धा व २०२८मधील ऑलिंपिकमध्ये फायदा होऊ शकणार आहे. खेळांच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवल्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला.