
शाहीन इंदूलकर - shahin.indulkar@gmail.com
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातला एक आठवडा माझ्यासाठी कृतियुक्त आनंद सोहळा होता. ‘मोरमित्रांची शाळा’ म्हणून ओळख असलेल्या ‘प्रयोगभूमी’त एका भिंतीवर आम्ही दोन मोर रंगवायचे ठरवलं होतं. त्यातून पुढे अजून एका भिंतीवर मोठं फुलपाखरू आलं, रंगीत गोष्टी, बरंच काही... कल्पना सुचत गेल्या आणि मोरमित्रांच्या शाळेला अजूनच बहर आला.