एलआयसीने उघडली नोकरीची दारे; तब्बल एवढी होणार भरती

बुधवार, 22 मे 2019

एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत.

नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे.

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज भरू इच्छितात त्यांच्यासाठी संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या असून 9 जूनची मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर 29 जूनपर्यंत अर्जदार परीक्षेसाठीचे प्रवेशपत्राची पीडीएफ स्वरूपातील फाईल डाऊनलोड करू शकतात. निवडप्रक्रीया ही 3 टप्प्यांतून पार पडेल.

परीक्षेचे स्वरूप
- ऑनलाईन परीक्षा (पूर्वपरीक्षा)
- ऑनलाईन परीक्षा (मुख्य)
- मुलाखत

पात्रतेचे निकष 
1. प्रथमच नव्याने काम करणारे व यापूर्वी एलआयसीमध्ये कामाचा अनुभव असलेले किंवा एलआयसी एजंट या परीक्षेसाठी पात्र असतील.
2. शासनाची मान्यता असलेल्या विद्यापीठांतून पदवी किंवा इन्शुरन्स ऑफ इन्स्टीट्युटमधून फेलोशीप असणे गरजेचे.
3. विमा क्षेत्रात 2 वर्ष व त्या पेक्षा जास्त अनुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्जदारांसाठी महत्त्वाचे मुद्दे :
- अर्जदारांसाठी 30 वर्षे वयोमर्यादा
- खुल्या वर्गासाठी 600 रूपये अर्ज फी
- आरक्षित वर्गासाठी 50 रूपये अर्ज फी 

विभागानुसार जागा
अहमदाबाद : 168
आमरावती : 77
औरंगाबाद : 74
भावनगर : 58
गांधीनगर : 71
गोवा : 58
कोल्हापूर : 54
मुंबई : 452
नाडीयाद : 47
नागपूर : 105
नांदेड : 31
नाशिक : 107
पुणे : 126
राजकोट : 90
सातारा: 29
सुरत : 81
ठाणे : 62
वडोदरा : 63


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC provides large amount of job for Apprentice Development Officer