

Lionel Messi India Visit
esakal
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी भारतात आला. त्याला बघण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी तुफान गर्दी केली. एवढ्या मोठ्या गर्दीतही तो दिसणे, त्याची खेळण्याची शैली प्रत्यक्ष बघणे, त्याचे चकवणे, त्याचे हुलकावणी देणे चाहत्यांना प्रेरणा देणारे होते. मेस्सीच्या या भारतभेटीने लगेच भारतीय ‘फुटबॉल’चे भविष्य यशोशिखरावर जाणार नाही; पण वातावरण निर्मितीसाठी अशा जगज्जेत्याचे येणे प्रेरणादायी ठरले आहे.
लियोनेल मेस्सी नावाचा महिमा भारतामध्ये मागील शनिवार ते सोमवार या तीन दिवसांच्या कालावधीत दिसून आला. अर्थात यात नावीन्य असे काही नव्हते. अर्जेंटिनाच्या या महान फुटबॉलपटूच्या प्रेमामध्ये जग न्हाऊन निघाले आहे. त्यामुळे त्याच्या नावाभोवती असलेले वलय हा चर्चेचा विषय नव्हे.