L.N Tallur Artist : निश्चितता संपल्यावर कलेचा उगम होतो ...

Contemporary Art and Sculpture : शिल्पकार आणि रचनाकार एल. एन. तल्लूर पुराणकथा, संग्रहालय संस्कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालत कलेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या कलाप्रवासातील प्रयोगशीलता आणि चौकस वृत्तीचा परिचय.
Contemporary Art and Sculpture

Contemporary Art and Sculpture

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

प्रत्यक्ष कलाकृती निर्माण करत शिल्पकार आणि रचनाकार एल. एन. तल्लूर शिकले नाहीत, तर इतरांना कलानिर्मिती करताना पाहून आपल्यात काही बदल केले. बडोद्याला शिकत असताना निरनिराळ्या विभागांतील स्टुडिओत जाणे आणि सहाध्यायांशी चर्चा करणे अशी त्यांनी सवय ठेवली.

जिथे निश्चितता संपते तिथे कलेची सुरुवात होते असे कलाकार एल. एन. तल्लूर मानतात. पुराण कथा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोणतेही क्षेत्र असो, वर्तमान हे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार आणि रचनाकार एल. एन. तल्लूर हे तोच तोचपणा नाकारतात मग तो राहण्याचा असो की विचारांचा. ते राहतात काही काळ कर्नाटकाच्या किनाऱ्यावरील गावात तर अन्यथा दक्षिण कोरिया या देशात. त्यांचे कलात्मक कामही कधी शिल्पकला तर कधी इन्स्टॉलेशन किंवा रचना शिल्प आणि काही वेळा डिजिटल माध्यमावर. हे सारे पुराणे, म्युझियम संस्कृती आणि नवीन तंत्रज्ञान यांच्याशी ते अनपेक्षित पद्धतीने जोडतात. तरी त्यांच्याशी संवाद साधताना पटकन लक्षात येते, की त्यांना प्रेरणा मिळते ती कीर्तीच्या ध्यासामुळे नव्हे तर त्यांच्या चौकस वृत्तीमुळे. त्यामुळे बहुतेक ते बोलायला सुरुवात करतात त्याचा कलेशी संबंध नसतो.

‘स्वास्थ्य मिळाले म्हणजे खेळ खल्लास!’ त्यांच्या राहण्यासंबंधी फक्त ते सांगत नाहीत तर त्यांच्या विचारसरणीविषयी.

Loading content, please wait...