कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।।

Mahabharat
Mahabharatesakal
Updated on

''अर्जुन हा संवेदनशील अशा सामान्य माणसाचे प्रतीक आहे. धर्मसंकटात माणसाचे मन निराश होऊन कच खाते. काय करावे? काय न करावे? हा प्रश्‍न सतावतो. गलितगात्र अर्जुनाला पाहून त्याचे सारथी झालेले भगवंत मग मात्र त्याच्या रथाबरोबर मनाचेही सारथ्य करतात. थोडे रागावून, थोडे डिवचून, थोडे समजावून त्याच्या शूरत्वाला आव्हान देतात. ‘अर्जुना अजूनही तू कसला विचार करत आहेस?’
सहज कर्म कौंतेय सदोषमवि न त्यजेत।। अ १८/ ४८

असे सांगत असताना ‘आपुला निजधर्मू तू पांही। जो आचरिता बाधू नाही।’ असेही सुचवतात. ‘स्वधर्मे रहाटता। सकल काम पूर्णता सहजे होये।।’ असं म्हणण्यासही विसरत नाहीत. पराक्रमाचा इंकार असणारे आणि ऐहिकाच्या कठोर भूमीवर उभे असणारे भगवंत म्हणतात, ‘या युद्धाचे जय- पराजय सारखेच श्रेयस्कर आहेत.''
- नंदा विजय देशपांडे, चेतनानगर, नाशिक

Mahabharat
प्रश्नाचा काला

‘हतो वा प्राप्ससि स्वर्ग। जित्वा वा मोक्ष्यसे महितो
तस्माद्‍ उतिष्ठ कौंतेय। युद्धाय कृत निश्चयः ।।’

येन केन प्रकारेण कर्तव्यच्युत अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करून युद्धकर्म करण्यास भाग पाडावे. हाच गीतेचा मूळ दृष्टिकोन आहे.

esakal

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भर्मा ते संङगेऽ स्त्वकर्माणि।।’ अ २/४७

आपल्या वाट्याला आलेले कर्म सदोष असले तरी ते कधी टाळता कामा नये. अर्जुना, कर्म करण्याची शक्ती मी देतो आणि कर्माचा साथीही मी होतो. चांगले-वार्ईट कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे. पण मग त्या त्या कर्माच्या फळाचा भोक्ता मात्र तू आहेस, हे लक्षात ठेव. जे घडेल जसे घडेल त्या कर्मानुसार तुला निश्चित फळ मिळेल. तेव्हा कर्म करण्याचे तुझ्या हातात आहेच, पण एकदा कर्म घडून गेले, की त्याचे फळ तुला केव्हा? कुठे? कधी आणि कोणते मिळेल हे आपल्या हातात राहात नाही. ते सर्वस्वी नियतीवर अवलंबून असते. सामान्य माणूस मात्र कर्म करण्याआधीच फायदा काय? अशी अपेक्षा ठेवूनच कर्म करतो आणि कर्मकर्त्याच्या अहंकारानेच विमूढ आत्मा कर्मबंधनात बांधला जातो.

काही कर्मांची फळे लगेच मिळतात, तर काही कर्मांची फळे काही दिवसांनी मिळतात, तर काहींची फळे याच जन्मात, तर काहींची जन्मजन्मांतराने मिळतात. अशावेळी वाटते दैवाधीन जगत्‌ सर्व।
‘न च मां तानि कर्माणि निवद्मति धनंजय।
उदासीनवदासीनमसक्त तेषु कर्मसु।।’ अ ९/९

कर्म करताना फळची अपेक्षा ठेवू नकोस. कारण अशावेळी विलंबित कर्माचे फळ मिळून भलतेच घडेल तर निराशा येईल. त्यापेक्षा कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडणार नाही. अशावेळी चांगले घडले तर आनंदीआनंदच आणि विपरीत घडले तरी सामोरे जाण्याची मनाची तयारी असतेच. कर्मफळ नको म्हणून कर्मच नाही केले तर तेही एक कर्मच होऊन कर्तव्यचुत होण्याचे पाप वाट्याला मात्र येईल. आप्तेष्टांची हिंसा नको म्हणून तू युद्ध टाळले तर शत्रू गप्प बसेल काय? शत्रू हल्ला करून कत्तल करेल. पारतंत्र्य भोगावे लागेल. तू युद्ध नको म्हणून पाठ फिरवशील तर तू त्यांना घाबरलास म्हणून तुला हीनवतील, तुझी निंदा करतील. त्यापेक्षा

Mahabharat
सरस्वतीचा आशीर्वाद महत्त्वाचा!

‘नियत कुरू कर्म त्वं।
‘उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्‍वरः।।’ अ १३/ २२

कर्म करण्याची शक्ती आत्मा देतो, तर कर्माचा कर्ता एका अर्थाने तोच होतो. तेव्हा कर्तृत्वाचा अहंकार मी कर्ता म्हणून आपण का घ्यावा? आणि मध्येच पडून कर्मफळ ओढावून घ्यावे. कर्मे ही प्रकृतिगुणांनुसार होणारच आहेत. ‘गुणा गुणेशु वर्तंत। या भावाने घडणारच आहेत, तर आपण कशाला त्यात ममत्वाने जीवभाव ओतावा. समोर आलेले कर्म चिकाटीने, योग्य हातवटीने आसक्तीरहीत करून ईश्‍वरावर सोडून द्यावे.
आणि जर स्वतःला कर्ता समजत असशील तर लक्षात ठेव-

‘अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌।
‘विविधाश्‍च पृथक्चेष्टा दैव चैवात्र पंचमम्‌।।’ १८/ १४

देह, इंद्रिय, जीवात्मा, प्राणशक्ती, दैव- प्रत्येकाला २०/ २० गुण दिले तर ८० टक्के काम आपल्याच हातात आहे. ते योग्यरितीने करून २० टक्के दैवावर सोडून मोकळे व्हावे. भगवंत यालाच कर्मयोग म्हणतात. योग कर्मसु कौशलम्‌। यशप्राप्ती नक्कीच होईल.
‘तस्मात उतिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्‍चयः।।

esakal

भगवंतांनी सांगितलेल्या कर्मयोगात सकाम कर्म आणि कर्मकांडाला मुळीच थारा नाही. कर्मसन्यास त्यांना मान्य नाही. कर्माची गती गहन आहे. कर्माची व्याप्ती फार भयंकर आहे. कलीयुगी दुःखी, कष्टी जिवांना हा कर्मयोगच तारेल. या कर्मामुळेच जिवाची स्वर्गापासून नरकापर्यंत येरझार चालू असते. त्यातून वाचवणारा हा निष्काम कर्मयोग सर्वश्रेष्ठ असून, भगवंतही त्याचे आचरण करतात.
‘न मां कर्माणि लिम्पान्ति न कर्मफले स्पृहा।
इति मां योऽ भिजानाति कर्मभिने स बध्यते।। अ ४/१४

एवढा वैकुंठीचा राणा, चराचराचा स्वामी. त्याचा मोठेपणा काय वर्णावा? कृष्णरुपाने जन्म घेताच गोकुळी गुरे राखली, अर्जुनाचे सारथ्य केले. अनेक राक्षसांचा वध केला. आपला मामा कंस याचाही वध करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. त्याने आपल्या जीवनात परस्पर विरोधी अनेक कामे केली. समोर आलेल्या कर्माला प्रतिष्ठा देऊन कोणतेच काम त्याज्य किंवा कमी लेखले नाही. तर ते आपले कर्तव्यच आहे म्हणून केले. एवढेच काय, धर्मराजाच्या राजसू यज्ञात यजमानांची उष्टींही उचलली आणि आपल्या स्वधर्मचरणातून निष्काम कर्मयोगाचा धडा घालून दिला. युगायुगातून साधूंचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्याचे अवतार- रहस्य सांगत असताना हळूच आपला निष्काम कर्मयोगही सांगितला.

esakal
Mahabharat
जटायू पुराण

‘आता भोग आपल्या कर्माची फळे...’ ‘करावे तसे भरावे...’, ‘जैसी करणी वैसी भरणी...’ कोणत्या जन्मीचे पाप भोगतो कोणास ठाऊक...’ आता केले ना मग त्याचे परिणामही भोगा...। अशा रोजच्या जीवनात ही अगदी सहजपणे आपल्या जीवनात भगवंताचे ‘कर्मण्येवाधिकारस्ते...।’ हे बोल किती मुरले त्याचा प्रत्यय येतो. आता कर्म या शब्दाचा अर्थ... एवढे कळले ना- तर ‘कर मग’ असेच भगवंत म्हणतात, असाच ध्वनित होतो. भगवंताच्या शब्दांवर विश्‍वास ठेवून आपण आपले काम चोख करावे. हेच खरे, बाकी सर्व भगवंत पाहून घेतील. त्याची चिंता आपण कशाला करा? कर्मण्येवाधिकारस्ते। या बोधवाक्यातून मानवी जीवनाबद्दलची अपार करुणाच जाणवते.
‘शिष्यते हं।’ म्हणून अर्जुनाने भगवंताला गुरुत्व दिले आणि भगवंता निष्काम कर्मयोग जीवनात पुरेपूर उतरवला. आता अर्जुन म्हणतो.
‘नष्टे। मोह। स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादामयाच्युत।
स्थितोऽ स्मि गतसंदेहः करिष्यें वचनं तव।।’ अ १८/ ७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com