राणीने जिंकला डाव!

माधुरी दीक्षितच्या नृत्याने 'राजा' चित्रपटाला दिली नवी ओळख
Madhuri best movies

Madhuri best movies

esakal

Updated on

दिलीप ठाकूर

glam.thakurdilip@gmail.com

बरोबर तीस वर्षे झाली या गोष्टीला. त्या नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत तरी नवीन चित्रपटाचा हाऊसफुल्ल गर्दीतील पहिला खेळ सुटला रे सुटला की एक पडदा चित्रपटगृहांमधून बाहेर पडणारा जनसामान्य चित्रपट रसिक आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतच बाहेर पडत असे. ‘राजा’ चित्रपटाला मिळालेली प्रतिक्रिया अशीच होती आणि तो डाव राणीने जिंकला होता.

इंद्रकुमार व अशोक ठाकरिया निर्मित व इंद्रकुमार दिग्दर्शित ‘राजा’ (१९९५) हा नावावरून नायकप्रधान मसालेदार मनोरंजक चित्रपट. चित्रपटात आपण काय, किती नि कसं दाखवायचं हा दिग्दर्शकाचा अधिकार; पण चित्रपट रसिकांना काही वेगळे दिसू व आवडू शकते. तो त्यांचा अधिकार. कारण त्यांनी रांगेत उभं राहून तिकीट काढून पडद्यावरच्या विश्वात मन रमवले आहे. ‘राजा’ चित्रपट त्यांनी असाच आवडीने एन्जॉय केला. ‘राजा’ पाहत असतानाच आपण ‘रानी’ (अर्थात राणी)चे दीवाने कधी झालो, हे त्यांना समजलंच नाही आणि पिक्चर संपून बाहेर पडताना अनेक जण म्हणाले, ‘‘हा ‘राजा’ नाही, ‘राणी’ चित्रपट आहे. माधुरी दीक्षित छा गयी. ती भाव खाऊन गेली. तिच्या बहारदार नृत्यासाठी पुन्हा एकदा नक्कीच ‘रानी’ पाहील...’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com