

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
महान बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने काही दिवसांपूर्वीच नॉर्वेत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद राखले. भारताचा विश्वविजेता डी. गुकेश व कार्लसन यांच्यामधील लढत या स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कार्लसनने पहिल्या लढतीत गुकेशला पराभूत केले. पुढल्या लढतीत मात्र गुकेशकडून त्याला हार पत्करावी लागली. हा पराभव कार्लसनच्या जिव्हारी लागला. गुकेशविरुद्धचा एकमेव पराभव वगळता ३४ वर्षीय कार्लसन याने या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय खेळ केला. आजही तो या खेळाचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे जगाला दाखवून दिले.