

Mahabaleshwar tourism guidebook with historical attractions
esakal
महाबळेश्वर पर्यटन
महाबळेश्वर, वाई, प्रतापगड.. हा परिसर निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेला असून, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लोक या भागात फिरण्यासाठी येतात. मात्र, फिरायला जाताना त्या भागाची संपूर्ण माहिती अचूक बारकाव्यांसह मिळवायची असेल, तर जगदीश लांजेकर लिखित ‘महाबळेश्वर पर्यटन’ हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. महाबळेश्वर, वाई, पांचगणीचा इतिहास आणि तेथील प्रेक्षणीय स्थळांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागातील उपाहारगृहे, निवास व्यवस्था, महत्त्वाच्या संस्था, उत्सव, स्थानिक लोकजीवन यांचीही माहिती देण्यात आली आहे.
वैशिष्ट्य : उपयुक्त संदर्भसूची, संपर्क क्रमांक, नकाशा व छायाचित्रांचा समावेश.
प्रकाशक : विद्यादीप प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १४४ मूल्य : २०० रु.