
Maharaja Sayajirao
sakal
महिमा ठोंबरे-editor@esakal.com
लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातूनच विविध योजना राबवताना नागरिकांवरच उपकार करत आहोत, असे मिरविणाऱ्या राजकारण्यांच्या काळात सध्या आपण वावरत आहोत. त्यामुळे प्रजेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून असंख्य लोककल्याणकारी योजना राबवत दातृत्वाचा विलक्षण आदर्श निर्माण करणाऱ्या राजाची कथा, ही आजच्या काळात दंतकथाही वाटू शकते. या प्रज्ञावंत राजाचे नाव आहे, महाराजा सयाजीराव गायकवाड. त्यांच्या या अद्भुत दातृत्वाच्या उदाहरणाचे महत्त्वाचे दस्तावेजीकरण ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ या पुस्तकाच्या निमित्ताने झाले आहे.