
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जसा लागला आहे, अगदी तसाच तो अपेक्षित होता असं कुणाला वाटलं होतं? भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती महाराष्ट्रात केवळ सत्तेवरच येईल असं नव्हे तर, २३५ जागांचं अवाढव्य बहुमत या युतीच्या पदरात पडेल असं भाकीत कुणी छातीठोकपणे वर्तवलं होतं?