महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत विधानसभा निवडणुकीमध्ये महिला शक्तीचा प्रत्यय आला आहे. दलित समाज आणि इतर मागासवर्गीय समाज यांची मतपेढी ज्याप्रमाणे निवडणुकीत काम करते, त्याप्रमाणे यापुढील काळात महिलांची मतपेढी असेल. किमानपक्षी या निवडणूक निकालानंतर या मतपेढीचा उदय झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.