हळव्या नातेसंबंधांचे सहजसुंदर चित्र!

लहानपणीच महाराष्ट्रातून केरळमध्ये राहायला गेलेल्या मराठी मुलाला या सर्वांशी जुळवून घेताना आलेल्या अडचणींचा, त्याच्या मानसिकेतत झालेल्या बदलांचा...
Mahesh Bardapurkar writes Cobalt Blue story beautiful picture of a gentle relationship
Mahesh Bardapurkar writes Cobalt Blue story beautiful picture of a gentle relationshipsakal
Summary

लहानपणीच महाराष्ट्रातून केरळमध्ये राहायला गेलेल्या मराठी मुलाला या सर्वांशी जुळवून घेताना आलेल्या अडचणींचा, त्याच्या मानसिकेतत झालेल्या बदलांचा, आपण समलैंगिक असल्याचं समजल्यावर त्याच्याशी लढण्याचा, त्यातही विचित्र त्रिकोण निर्माण झाल्यावर आलेल्या नैराश्‍याचा पट सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘कोबाल्ट ब्लू’ हा चित्रपट उभा करतो.

आपल्याला ज्ञान नसलेल्या संस्कृतीशी, भावनांशी जुळवून घेणं भल्याभल्यांना अवघड जातं. लहानपणीच महाराष्ट्रातून केरळमध्ये राहायला गेलेल्या मराठी मुलाला या सर्वांशी जुळवून घेताना आलेल्या अडचणींचा, त्याच्या मानसिकेतत झालेल्या बदलांचा, आपण समलैंगिक असल्याचं समजल्यावर त्याच्याशी लढण्याचा, त्यातही विचित्र त्रिकोण निर्माण झाल्यावर आलेल्या नैराश्‍याचा पट सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘कोबाल्ट ब्लू’ हा चित्रपट उभा करतो. हे करताना नेटक्या अभिनय व दिग्दर्शनाबरोबर कोचीचा नेत्रसुखद निसर्ग, संस्कृती, राहणीमान यांचं चित्रण, संगीत, संवाद यांची सुरेल मैफील सजवतो. फारशी प्रसिद्ध न मिळताच ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला हा वेगळा चित्रपट एकदा अनुभवावा असाच आहे.

‘कोबाल्ट ब्लू’ची कथा कोची शहरात सुरू होते. तनय दीक्षित (नीलय मेहेंदळे) हा युवक कॉलेजमध्ये शिकत असताना सर्वांपासून तुटक राहतो, तळ्यातील एका कासवाशीच संवाद साधत बसतो. त्याची आई श्रद्धा (गीतांजली कुलकर्णी) व वडील (शिशीर शर्मा) त्याच्या वागणुकीवर लक्ष ठेऊन असतात, मात्र परीक्षेतील यश आणि कविता लेखनामध्ये गुंग या मुलाकडून त्यांना मोठ्या अपेक्षाही असतात. तनयची बहीण अनुजाला (अंजली शिवरामन) हॉकी खेळामध्ये करिअर करायचं असतं आणि ती एखाद्या डॅशिंग जोडीदाराच्या शोधात असते. तनय तिच्या अगदी विरुद्ध बुजरा, स्वतःत रमणारा युवक असतो. त्याचवेळी त्यांच्या घरामध्ये एक अनामिक युवक (प्रतीक बब्बर) पेइंग गेस्ट म्हणून राहायला येतो. त्याच्या येण्यानं तनयच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेले तनय व अनुजा त्याच युवकाच्या प्रेमात पडतात. परिस्थिती अवघड वळणं घेते व भाऊ-बहिणीच्या आयुष्यात मोठं वादळ येतं. या परिस्थितीत तनयचा शिक्षक (नील भूपालम) त्याच्यासाठी थोडा आधार घेऊन येतो, मात्र तोही कायमस्वरूपी ठरत नाही.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मनं पाय रोवल्यानंतर एलजीबीटीक्यू आणि समलैंगिकतेबद्दल चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून बरंच काही प्रेक्षकांवर येऊन आदळलं आहे. यापैकी बहुतांश गोष्टी अनेकदा सवंगतेकडं झुकलेल्या दिसतात. स्वतःच्या अनुभवांवर ‘कोबाल्ट ब्लू’ कादंबरी लिहिलेल्या सचिन कुंडलकर यांनी मात्र समलैंगिक व्यक्तींच्या मानसिकतेचा मागोवा घेत त्यांच्या भावभावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे दाखवण्यासाठी निवड केलेले प्रसंग नेटके, पात्रांची मानसिकता स्पष्ट करणारे आणि त्यांच्या मनातील आंदोलनांचा नेमका माग घेणारे आहेत. या पात्रांबाबत घृणा निर्माण होणार नाही याचीही काळजी दिग्दर्शकानं आपल्या हळव्या मांडणीतून घेतली आहे. चित्रपटाचा शेवट तरल असला, तरी अपेक्षित आहे.

नीलय मेहेंदळे या सध्या ‘आयसर’मध्ये संशोधक असलेल्या अभिनेत्याचा हा पहिलाच चित्रपट. त्यानं तनयची आव्हानात्मक भूमिका सहज पेलली असून, त्याच्या आयुष्यातील वादळं दाखवताना दमदार कामगिरी केली आहे. प्रतीक बब्बरनं छोट्या भूमिकेत गहिरे रंग भरले आहेत. त्याची देहबोली आणि आवाज भूमिकेला पोषक ठरले आहेत. अंजली शिवरामन, गीतांजली कुलकर्णी, शिशीर शर्मा आदींना त्यांना चांगली साथ दिली आहे. एकंदरीतच, हा चित्रपट वेगळ्या विषयाची तरल मांडणी करीत मोठ्या पडद्यावरील हळव्या पेंटिंगचा अनुभव प्रेक्षकांना देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com