मानवी पुस्तकांचे ग्रंथालय

दोन डॅनिश बंधू वीस वर्षांहून अधिक काळापासून नागरिकांचे पूर्वापार चालत आलेले पूर्वग्रह तोडण्याचे काम करत आहेत. ‘एखाद्याला न्याय द्या’ या संदेशाचा ते त्यांच्या अनोख्या ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रसार करत आहेत.
Books
BooksSakal
Summary

दोन डॅनिश बंधू वीस वर्षांहून अधिक काळापासून नागरिकांचे पूर्वापार चालत आलेले पूर्वग्रह तोडण्याचे काम करत आहेत. ‘एखाद्याला न्याय द्या’ या संदेशाचा ते त्यांच्या अनोख्या ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रसार करत आहेत.

- मालिनी नायर

विचार प्रगल्भ व्हावे म्हणून माणूस पुस्तकं वाचतो. जगातील सर्वच विषयांची माहिती माणूस पुस्तकातून मिळवतो; परंतु तुम्ही माणसाला शेवटचे कधी वाचले, असे कुणी विचारल्यास ही संकल्पना काल्पनिक वाटेल; मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सर्वसामान्य ग्रंथालयाप्रमाणे येथेही विविध विषयांची वर्गवारी आहे. आवडीचा विषय निवडून माणसं वाचता येतात.

दोन डॅनिश बंधू वीस वर्षांहून अधिक काळापासून नागरिकांचे पूर्वापार चालत आलेले पूर्वग्रह तोडण्याचे काम करत आहेत. ‘एखाद्याला न्याय द्या’ या संदेशाचा ते त्यांच्या अनोख्या ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रसार करत आहेत. आजकाल आपण एकमेकांना रंग, सामाजिक स्थिती, संस्कृती, धर्म, जात, लिंग, श्रद्धा, मूल्ये आणि इतर अनेक गोष्टींद्वारे ओळखत असतो. अशा या पक्षपातीपणाने ग्रासलेल्या सामाजिक परिस्थितीत आपल्याला हा पूर्वग्रह तोडण्याची खूप आवश्यकता आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? संभाषणासाठी सकारात्मक आराखड्याची रचना तयार करून परस्परसंवादाने पूर्वग्रह आणि पक्षपाती असंवेदनशीलपणाला आव्हान देता येते, अशी ही संकल्पना आहे.

आपल्या मनाला शिकवण्यासाठी अनेकदा वाचनाची आवश्यकता असते. पुस्तकं हे आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. आता कल्पना करा, की एक पुस्तक स्वतःहून वाचन करते आणि संवादही साधते. मानवी ग्रंथालयातील पुस्तके नेमके हेच करतात. संभाषणाच्या मार्गाने लोकांमधील पूर्वग्रह आणि पक्षपातीपणा कमी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले ग्रंथालय ही एक अनोखी संकल्पना आहे. मानवी ग्रंथालय हे असे ठिकाण आहे, जिथे वाचक येऊन प्रत्यक्ष व्यक्तीला वैयक्तिक आयुष्याची कथा सांगण्यासाठी पैसे देऊ शकतात. इतर सर्वसामान्य ग्रंथालयाप्रमाणे येथेही विविध विषयांची वर्गवारी आहे. आवडीचा विषय वाचक निवडू शकतात. यामध्ये आपल्याजवळील अद्वितीय जीवनकथा सामायिक करणाऱ्या काही निवडक लोकांची यादी आहे. एक व्यक्ती निवडल्यानंतर शीर्षकाशी जोडलेल्या व्यक्तीशी वाचकाची ओळख करून दिली जाते आणि त्यांना एकत्र बसण्यासाठी जागा दिली जाते. नंतर मानवी पुस्तक त्यांची अनोखी कथा वाचकाला सांगते. ऑटिजमपासून, व्यसनाधीन लोक, बहिरे लोक, एचआयव्ही पॉझिटिव्ह, बेघर, निसर्गवादी, धर्मांतरित, लैंगिक शोषण झालेले, बेरोजगार, एकल माता असलेले, गतिमंद, तस्करी करण्यात आलेले लोक, ज्यांचे जीवन मोठ्या घटनांमुळे बदलले आहे, अशा विविध घटनांच्या विषयांच्या मानवी पुस्तकांची ओळख ग्रंथालयातील स्वयंसेवक करून देतात. वाचकांच्या कोणत्याही आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुस्तके तयार असतात; अगदी कठीण प्रश्नांचीदेखील. तथापि, इतर माणसांबद्दल येथे संवेदनशीलता बाळगणे हा ग्रंथालयातील अपेक्षित शिष्टाचार आहे.

डॅनिशमध्ये मानवी ग्रंथालय किंवा ‘मेन्नेस्केबिब्लायोटेकेट’ असे म्हटले जाते. सन २००० मध्ये कोपनहेगनमध्ये रोन्नी अबर्गेल, त्याचा भाऊ डॅनी, सहकारी अस्मा मौना आणि क्रिस्टोफर एरिचसेन यांनी मानवी ग्रंथालय तयार केले होते. ह्युमन लायब्ररी ऑर्गनायझेशन (एचएलओ) या संस्थेच्या स्थापनेमागे खूपच मनोरंजक गोष्ट आहे. डेन्मार्कमध्ये मानवाधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार असलेल्या रोन्नी अबर्गेल यांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून ‘स्टॉप द व्हायोलेन्स’ नावाची युवकांची संस्था स्थापन केली आहे. तरुणांविरुद्धचे हिंसक गुन्हे कमी करण्यासाठी समवयस्क शिक्षण देणे, हा त्यांचा त्यामागील उद्देश होता. डेन्मार्कमधील रोस्किलेड महोत्सवाच्या आयोजकांना ही संकल्पना मनापासून आवडली.

अहिंसेचा संदेश देण्यासाठी त्या कथा जगलेल्या माणसांचा आणि हिंसेचे वास्तविक जीवनातील कथांचा समावेश असलेले नवे ग्रंथालय सुरू करण्यास सुचवले. या महोत्सवादरम्यान ७५ मानवी पुस्तके सादर करण्यात आली. महोत्सवातील उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले आणि या संकल्पनेला सुरुवात झाली. ही पुस्तके म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून स्वयंसेवकच होती. त्यांनी काही प्रकारचे भेदभाव किंवा गैरवर्तन अनुभवले होते. त्यांच्या या गोष्टी दुसऱ्यांना सांगण्यास ते तयार झाले होते. त्यामुळे या मानवी पुस्तकांचा अनुभव अद्वितीय ठरतो. ही ग्रंथालये परस्परसंवादी असल्याने वाचकांना गुंतवून ठेवतात. तसेच मानवी पुस्तके त्यांच्या इच्छेनुसार संभाषण चालवू शकतात. उदा. काही वाचकांचे कठीण किंवा विचित्र प्रश्न असू शकतात, ज्यांची उत्तरे त्यांना हवी असतात आणि त्याविषयी बाहेर इतर कुणाला विचारण्यास लाज वाटते. मानवी पुस्तके त्या वाचकांसाठी उत्तरे देऊ शकतात. त्यामुळे वाचकांना त्यांच्याबद्दलचा पूर्वग्रह तोडण्यास मदत होऊ शकते. उदा. लैंगिक विषयांबाबत जगात अजूनही उघडपणे चर्चा केली जात नाही. या सर्व गोष्टींवर मानवी ग्रंथालयांमध्ये खुल्यापणाने चर्चा केली जाते. मानवी पुस्तकांना त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते. केवळ सांगण्यासाठी कथा असणे पुरेसे नसते, परंतु चिरस्थायी ठसा उमटवण्यासाठी आणि इतर लोकांच्या पूर्वाग्रहांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कथेचे कथनदेखील प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.

सुमारे दोन दशकांच्या कालखंडानंतर या स्वयंसेवी संस्थेकडे आज जगातील ८५ देशांमधील ५० हून अधिक भाषांमध्ये सुमारे एक हजार मानवी पुस्तके आहेत. त्यांच्या प्रत्येक युनिटने शाळा, महोत्सव, संग्रहालये आणि इतर ग्रंथालयांमध्ये अनेक स्थानिक उपक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांद्वारे लोकांचा पक्षपातीपणा आणि पूर्वग्रह दूर करण्याचा संदेश पसरवला जात आहे. या दृष्टिकोनाला संशोधनानेही दुजोरा दिला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे, की दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनात केवळ १० मिनिटे गुंतवून ठेवल्यास एखाद्या व्यक्तीच्या समजांवर दीर्घकाळापर्यंत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे पूर्वग्रह कमी करण्यासाठी काही दिवसांपासून ‘संपर्क गृहितकां’वर संशोधन सुरू आहे. संपर्क गृहितक सिद्धांतानुसार जेव्हा लोकांचे गट अनुकूल परिस्थितीत एकत्रित आणले जातात, तेव्हा त्यांना सहिष्णुता विकसित करण्यास आणि एकमेकांच्या मतभेदांना स्वीकारण्यास मदत करू शकतात.

लिंग परिवर्तन करणाऱ्या लोकांना घरोघरी जाऊन शिक्षित करण्यात आले, तेव्हा त्यांच्याविरुद्धचा पक्षपातीपणा आणि भय लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. लिंग परिवर्तन करणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेण्यास ते सक्षम होते आणि जनतेलाही समजून सांगण्यास मदत करत होते. काही कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांवर आठ बिलियन अमेरिकी डॉलर खर्च करतात. जिथे विविधता आणि सर्वसमावेशकतेची स्वीकृती वाढण्याऐवजी सहभागी झालेले लोक हे विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांमुळे कल्पनेच्या अधिक जवळ जात आहेत. या कारणामुळे संस्था कमी वैविध्यपूर्ण बनली आहे आणि अशा प्रकरच्या विशिष्ट वंश, लिंग, धर्म इत्यादीबद्दलच्या रुढींना बळकटी दिली आहे. अशा संस्थांना मानवी ग्रंथालयांचा पाठिंबा मिळवण्याचा मोठा फायदा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक जागरुकता निर्माण करणे, तसेच ग्राहक आणि समुदायांसोबत चांगल्या भागीदारीला प्रोत्साहन देणे याविषयीचे प्रशिक्षण अनेक संस्थांना दिले जाते. त्यामुळे त्यांना कलंकित भेदभाव किंवा रुढीवादी असण्याचे स्वतःचे अनुभव सामायिक करून सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक भेदांविरुद्धचे त्यांचे वैयक्तिक पूर्वग्रह समजून घेण्यास आणि त्याचे निराकरण करण्यास मदत मिळते. असे उपक्रम वाचकांना एखाद्या व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवण्यास मदत करतात; अन्यथा ते घाबरून पूर्वग्रहदूषित असल्याने पक्षपातीच राहतात.

प्यू संशोधन केंद्राच्या अहवालानुसार, कोविड महामारी सुरू झाल्यापासून राष्ट्रीय दुफळी वाढल्याचे ६० टक्क्यांहून अधिक लोक सांगतात. त्यामुळे मानवी ग्रंथालयांची संकल्पना लोकांना एकत्रित आणण्यावर भर देते.

भारतात या संस्थेची सुरुवात इंदूर या शहरापासून झाली आणि बघता बघता या संस्थेची दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई येथेही कार्यालये सुरू झाली आहेत. देशातील लिंगभेद, लैंगिक अत्याचाराच्या कथा, मानसिक आरोग्याच्या समस्यांना मानवी पुस्तकांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. वाचक प्रथमच मानवी पुस्तकांशी जोडले गेले आहेत. या कालावधीत चेन्नई येथील मानवी ग्रंथालयाने १७ मानवी पुस्तके १५० ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहेत. इतकेच काय, डॅनिश संशोधन सल्लागार ॲनालाईज आणि टॅल यांनी २०२१ मध्ये झेड-झुरिच फाऊंडेशनद्वारे एक संशोधन केले. त्यानुसार मानवी ग्रंथालयातील घटना वाचकांना केवळ विविधता समजण्यास प्रवृत्त करत नाहीत; तर ते समजून घेण्यासदेखील मदत करतात. स्वीकृती आणि मान्यता यांच्या पलीकडे जाऊन कृती करणे महत्त्वाचे आहे. जात, संस्कृती, धर्म, लिंग, शारीरिक क्षमता/ अपंगत्व, लैंगिक अभिमुखतेचा विचार न करता प्रत्येकाने अस्तित्व निर्माण करण्यासाठी समाजाच्या जडणघडणीतून जुने निराधार पूर्वग्रह नष्ट केले पाहिजेत. त्याची खात्री करण्यासाठी लोकांना प्रभावीपणे एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच हे जग, आपण आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी एक चांगले स्थान बनू शकते.

nairmalini2013@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com