निसर्गरम्य मालदिव

सुंदर असे समुद्रकिनारे, समुद्राचं काचेसारखं स्वच्छ पाणी, जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गणले जाणारे रिसॉर्ट्स, जगभरातील सेलिब्रिटींचं सर्वांत आवडतं ठिकाण आणि सर्वसामान्यांचे ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे मालदिव.
maldives
maldivessakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

सुंदर असे समुद्रकिनारे, समुद्राचं काचेसारखं स्वच्छ पाणी, जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गणले जाणारे रिसॉर्ट्स, जगभरातील सेलिब्रिटींचं सर्वांत आवडतं ठिकाण आणि सर्वसामान्यांचे ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे मालदिव. फिरण्यासाठी अतिशय महागडा, आवाक्याबाहेरील बजेट असणारा देश, समुद्र सोडून बघण्यासारखे काही नाही, हनिमूनर्स डेस्टिनेशन आदी अनेक चुकीचे भ्रम मालदिवबद्दल आहेत. त्यामुळे भारताच्या अगदी जवळ असून सुद्धा नेपाळ, भूतान किंवा श्रीलंकेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक अजूनसुद्धा मालदिवला जात नाहीत.

भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश असणारे जगाच्या पाठीवर मोजकेच देश आहेत त्यातील एक मालदिव आहे, साधारणतः सलग तीस दिवस येथे भारतीयांना व्हिसाशिवाय राहता येते. मुंबई, बंगळूर, कोची अशा शहरांमधून थेट मालदिवसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. रिटर्न तिकीट काढल्यास अतिशय चांगली डील मिळते ठरावीक महिन्यांमध्ये तर अक्षरशः दहा हजार रुपयात बंगळूर-मालदिव-बंगळूर असे तिकीट मिळते.

मालदिव देश योग्य रीतीने समजून घेतल्यास फिरण्यास कोणतेही अडचण येत नाही. मालदिव देश २६ प्रवाळ द्वीप समूह यांचा बनलेला असून एकूण बेटांची संख्या ११९२ इतकी आहे. यातील दोनशेहून अधिक बेटांवर स्थानिक लहान वस्त्या किंवा छोटी शहरे अथवा गाव आहेत, तर जवळपास १८० बेटे ही रिसॉर्ट आयलंड आहेत म्हणजेच खाजगी बेटे असून यावर जगप्रसिद्ध हॉटेल कंपन्यांचे रिसॉर्ट आहेत. उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग या बेटांचे पडतात आणि त्यातही प्रत्येक विभागात वरील बाजू व खालील बाजू असे उपविभाग आहेत.

Male
MaleSakal

मालदिवमधील बेटांवर डझनभर विमानतळे असून त्यातील फक्त माले आणि आदू ही दोनच विमानतळे आंतरराष्ट्रीय आहेत. त्यातील माले या राजधानीच्या शहरात असलेले वलेना विमानतळ देशातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. वलेना विमानतळापासून किंवा राजधानी मालेपासून इतर बेटांवर जाण्यासाठी स्पीडबोट आणि सी प्लेन अशी साधने उपलब्ध आहेत.

माले शहरांमध्ये अंतर्गत फिरण्यासाठी बसेस, टॅक्सी उपलब्ध आहेत. खासगी बेट अथवा सार्वजनिक बेटे यापैकी कोठे आपण राहणार आहात यावर दळणवळणाचे साधन निश्चित होते. स्थानिक लोकवस्ती असलेल्या म्हणजेच सार्वजनिक बेटांवर जाण्यासाठी सरकारी बोट सेवा उपलब्ध आहे तसेच लांब वरील ठिकाणी जाण्यासाठी आंतरदेशीय विमान सेवा सुद्धा आहे याउलट खासगी रिसॉर्ट आयलँड वर जाण्यासाठी ज्या स्पीड बोट आणि विमान उपलब्ध आहेत ती अतिशय अवास्तव दराने असतात.

मालदिवमधील बेटांवर डझनभर विमानतळे असून त्यातील फक्त माले आणि आदू ही दोनच विमानतळे आंतरराष्ट्रीय आहेत. त्यातील माले या राजधानीच्या शहरात असलेले वलेना विमानतळ देशातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. वलेना विमानतळापासून किंवा राजधानी मालेपासून इतर बेटांवर जाण्यासाठी स्पीडबोट आणि सी प्लेन अशी साधने उपलब्ध आहेत. माले शहरांमध्ये अंतर्गत फिरण्यासाठी बसेस, टॅक्सी उपलब्ध आहेत.

खासगी बेट अथवा सार्वजनिक बेटे यापैकी कोठे आपण राहणार आहात यावर दळणवळणाचे साधन निश्चित होते. स्थानिक लोकवस्ती असलेल्या म्हणजेच सार्वजनिक बेटांवर जाण्यासाठी सरकारी बोट सेवा उपलब्ध आहे तसेच लांब वरील ठिकाणी जाण्यासाठी आंतरदेशीय विमान सेवा सुद्धा आहे याउलट खासगी रिसॉर्ट आयलँड वर जाण्यासाठी ज्या स्पीड बोट आणि विमान उपलब्ध आहेत ती अतिशय अवास्तव दराने असतात.

काही जगावेगळे अनुभव हे फक्त मालदिवमध्ये घेता येतात. येथील काही रिसॉर्टमध्ये दोन मजली वॉटरव्हिला आहेत यामध्ये तळमजला पाण्याखाली आणि पहिला मजला पाण्याच्यावर अशी व्यवस्था आहे, खालचा मधला संपूर्णपणे काचेचा असून समुद्राखालची पूर्ण सृष्टी आपल्याला पाहता येते. मालदिवमधील काही बेटे लग्नसमारंभ अथवा खाजगी कार्यक्रमांसाठी भाड्याने घेता येतात.

हौशी पर्यटकांना मोठ्या माशांची मासेमारी करण्यासाठी मोठ्या बोटी अद्ययावत उपकरणांसह येथे भाड्याने मिळतात, अनेक रिसॉर्ट्समध्येच ही सोय आता उपलब्ध आहे. मालदिवच्या समुद्रात अत्यंत दुर्मीळ असे वनस्पती व प्राणी आहेत ज्यामुळे येथे समुद्राला युनेस्को संरक्षित बायोस्फियर चा दर्जा दिला गेला आहे.

समुद्रातील अत्यंत दुर्मीळ असे काही जीव फक्त रात्रीच्या वेळेस पाण्यात फिरतात त्यांना बघण्यासाठी ब्लॅकवॉटर ड्रायव्हिंगचा आगळावेगळा अनुभव इथेच घेता येतो. अवाढव्य आकाराच्या रे फिश आणि व्हेल शार्क यांच्यासारख्या जलचरांना जवळून बघण्याची आणि त्यांच्यासोबत पोहण्याची संधी काही स्कुबा डायविंग इन्स्टिट्यूट उपलब्ध करून देतात.

जगभरातून पर्यटक मालदिवला ज्यासाठी येतात ते प्रमुख आकर्षण म्हणजे वॉटरव्हिला. वॉटरव्हिला म्हणजे अगदी समुद्रातच सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांसह व्हिला उभारला जातो यामध्ये वैयक्तिक किचन वैयक्तिक स्विमिंग पूल आणि आजूबाजूला लांब वर चालत जाता येईल इतकाच कमरेपर्यंत खोल नितळ समुद्र.

हे वॉटरव्हिला मुख्यत्वे खाजगी रिसॉर्ट आयलँडवर उपलब्ध असतात. वीस हजारापासून ते काही लाखांपर्यंत या वॉटरव्हिलासाठी पैसे आकारले जातात. रिसॉर्ट द्वारे अतिशय काटेकोरपणे पर्यटकांची प्रायव्हसी जपली जात असल्याने वॉटरव्हिलाला सेलिब्रिटी आणि हनिमून कपल पसंती देतात.

चार-पाच दिवस जर आपण मालदिवला राहणार असाल तर एकाच बेटावरील एकाच रिसॉर्टमध्ये सलग पाच दिवस राहणे काही जणांसाठी कंटाळवाणे वाटू शकते, अशा वेळी दोन दिवस रिसॉर्टमध्ये आणि दोन-तीन दिवस येथील सार्वजनिक बेटांवर राहता येईल ज्यामुळे येथील स्थानिक लोकांचे दैनंदिन जीवन जवळून बघता येईल.

माफुशी, धिफुशी, उकुल्हास, वाडू, धिदुरा, थोडू, फुलाडू इत्यादी प्रसिद्ध स्थानिक बेटे आहेत. रिसॉर्टइतकेच सुंदर समुद्रकिनारे अतिशय उत्कृष्ट अशी रिसॉर्ट इथे सुद्धा उपलब्ध आहेत. येथील पन्नासपेक्षा जास्त बेटांवर आता रिसॉर्ट आणि गेस्ट हाऊस उपलब्ध असल्याने पर्यटकांचा ओढा तिथंसुद्धा वाढत आहे.

स्थानिक बेटांवर फिरताना तेथील संस्कृतीचा तिथल्या चालीरीतींचा आदर राखण्याचा प्रयत्न करावा. मुस्लिम देश असल्याने स्थानिक बेटांवर काही गोष्टी वर्ज्य आहेत याचे भान असावे. येथील लोक अतिशय आतिथ्यशील असल्याने पर्यटकांना पटकन आपल्यात सामावून घेतात.

इथलं चलन मालदिवियन रुपया आहे पण अमेरिकन डॉलरसुद्धा सर्वत्र स्वीकारला जातो. राजधानीचे माले शहर फार मोठे नसल्याने पूर्ण शहराचा फेरफटका एका दिवसात मारून होतो. इथली अठराव्या शतकातील जुनी मशीद, नॅशनल आर्ट गॅलरी, संग्रहालय, सुनामीची आठवण म्हणून उभारलेला स्तंभ, सुलतान पार्क इत्यादी गोष्टी बघता येतील. मालदिवच्या खाद्यसंस्कृतीवर भारतीय, श्रीलंकन, दक्षिणपूर्व आशिया व आखाती देशांचा प्रभाव जाणवतो. धोंकेयो काजुरू ही बेसन पिठामध्ये बुडवून तळलेली केळी, मासा आणि ओला नारळ एकत्र करून केलेली भाजी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहेत.

वॉटरस्पोर्टसाठी मालदिव जगप्रसिद्ध आहे. प्रवाळ बेटे, नितळ पाणी आणि समुद्राखालील जीवसृष्टी बघण्यासाठी लाखो परदेशी पर्यटक येथे भेट देतात आणि स्कुबा डायविंग, snorkling, जेट स्की, कयाकींग या खेळांचा आनंद घेतात. मालदिवमधील प्रसिद्ध बेटे फिरता यावीत आणि तिथे राहता यावं यासाठी काही क्रुझ कंपन्यांची तीन दिवसांपासून ते अगदी १४ दिवसांपर्यंतच्या आयलँड हॉपिंग टूर्स आहेत.

भारतातून मालदिवला जाताना अजून एखादा देश करायचा असेल तर श्रीलंकन एअरलाइनची स्टॉप ओव्हर ऑफर आहे, ज्यामध्ये भारतातून आधी श्रीलंकेला जाऊन तिथे दोन ते तीन रात्री थांबून फिरून तिथून मालदिवला जाता येते आणि प्रवास संपवून पुन्हा भारतात येता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com