
प्रा. विश्वास वसेकर- editor@esakal.com
डॉ. राजेंद्र माने हे प्रथितयश लेखक असून कथा-कादंबरीच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. नुकताच चपराक प्रकाशनने प्रसिद्ध केलेला त्यांचा ‘मनापासून’ हा ललितगद्याचा संग्रह हाती आला आणि हा वाङ्मयप्रकार ते उत्तमपणे हाताळू शकतात, हे सिद्ध झाले. एकाहून एक सरस असे ललितलेख यात आहेत.