

Marathi Book Reviews
sakal
द सीक्रेट मिशन
‘द सीक्रेट मिशन’ ही राधिका कुलकर्णी यांनी लिहिलेली रहस्यमय कादंबरी आहे. एका छोट्या गावात एक तरुण इन्पेक्टर कामावर रुजू होतो. तो तिथे बेपत्ता व्यक्तींच्या ‘पेंडिंग फाइल्स’चा अभ्यास करतो. गावाचा फेरफटका मारताना त्याला एक शिवमंदिर दिसते. त्याच्याविषयीच्या काही आख्यायिका समजतात, गूढ उकलते. दरम्यानच्या काळात गावातल्या काही व्यक्ती बेपत्ता होतात, काहींचे अपहरण होते. या सर्व प्रकरणाचा तपास तो इन्स्पेक्टर कसा लावतो? याचे उत्कंठावर्धक वर्णन या कादंबरीत करण्यात आले आहे. १९ प्रकरणांमध्ये कादंबरीचा पट उलगडण्यात आला आहे.
वैशिष्ट्ये : रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतील विजेती संहिता. रवींद्र गुर्जर यांची प्रस्तावना.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १७२ मूल्य : २६० रु.