- प्रज्ञा लक्ष्मणराव करडखेडकर, editor@esakal.com
सध्या मराठी गझलचे अमाप पीक येत आहे. फेसबुकच्या माध्यमातून एकेक कवी हजारोंच्या संख्येने गझल लिहीत आहेत, शिवाय ते जाहीरपणे सांगतही आहेत. मोबाइलवर लिहिल्या गेलेल्या शंभरातल्या नव्याण्णव गझल निकृष्ट आणि तंत्रशरण झाल्या आहेत.
त्यामुळे या कवींसाठी अशा एका ग्रंथाची आवश्यकता होती, जो गझल लिहिण्यापूर्वी या प्रकाराचे स्वरूप शास्त्रशुद्धपणे समजावून सांगू शकेल. मराठी गझल संशोधक डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला मराठी गझल हा ग्रंथ या कामी मोठाच उपयुक्त ठरणार आहे.