मराठीची अवीट गोडी

मराठी भाषेतील शब्दांचे खेळ आणि कोट्या: एक अनोखा अनुभव
Beauty of marathi language

Beauty of marathi language

esakal

Updated on

ऋचा थत्ते

rucha19feb@gmail.com

मराठीतील शाब्दिक खेळ, कोट्या वाचताना वाटून जातं, की खरंच किती श्रीमंत आहे आपली मायमराठी! भाषेची श्रीमंती असल्यामुळे हे शक्य होतं. आपल्या सर्व थोर साहित्यिकांच्या संस्कारांमुळेच मलाही शब्दांशी खेळायचा नाद लागला आणि अशा खेळातून काही छान गवसतं.

आम्ही मनालीमध्ये जेवत असताना कानावर मराठी बोलणं पडलं आणि स्वाभाविकच चमकून पाहिलं. ते कुटुंबदेखील मनापासून हसलं, मग थोडा संवाद झाला. असा हा अनुभव सर्वांनाच येत असेल. कसं होणार मराठीचं? असं वाटण्याचं कारण नाही, कारण आजही तिची श्रीमंती पदोपदी जाणवते. अगदी समाजमाध्यमांवरही. स्क्रोल करता करता एका फोटोत दिसलेलं हे वाक्य- ‘जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही.’ वाचलं आणि मनात अक्षरशः घर करून राहिलं. शब्दशः ठेचा खातात तो जेवणात आणि अडचणीरूपी ठेचा अनुभवास येतात त्या जीवनात! यातही जेवण आणि जीवन या शब्दातील साधर्म्य नेमकेपणानं टिपलं होतं. असे शाब्दिक खेळ, कोट्या वाचताना रंजन तर होतंच; पण प्रत्येक वेळी वाटून जातं, की खरंच किती श्रीमंत आहे आपली मायमराठी!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com