
नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी किंवा परिक्रमेचे अनुभव वाचण्याची इच्छा बाळगणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक पर्वणी आहे. लोकसाधना हीच आपली जीवनसाधना आहे असे मानून डॉ. राजा दांडेकर यांनी लोकमाता नर्मदा नदीची परिक्रमा केली. परिक्रमा मार्गातील ४ राज्ये आणि ८०७ गावांशी येणारा संपर्क, यातून जे जे हाती लागलं, ते मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यामु ळे अनुभवकथन, निरीक्षण यांबरोबरच हे लेखन नर्मदेच्या काठावरच्या लोकजीवनाची शोधयात्रादेखील उलगडत जातं.
वैशिष्ट्य : नर्मदा परिक्रमेचा मार्ग, नियम, साहित्याची यादी, महत्त्वाचे संपर्क, नकाशे, छायाचित्रांसह महत्त्वाचे तपशील समाविष्ट.
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन
पृष्ठे : १३६ मूल्य : २०० रु.