

Pandharipande’s Critical Approach and Research Depth
Sakal
रोहित वाळिंबे mayur.bhave@esakal.com
महाराष्ट्राला कवींची मोठी परंपरा लाभली आहे. संत कवी आणि स्वातंत्र्यकवींपासून सुधारणा काळातील नवमहाराष्ट्राचे अग्रदूत ठरलेल्या सुधारक कवींपर्यंत सर्वांनीच मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. येथील समाजमनाच्या जडण-घडणीत या कवींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. एकीकडे या कवींनी सुधारणावादाचा पुरस्कार करत येथील समाजपुरुषाला लागलेली जुनाट विचारांची जळमटे काढून टाकण्यासाठी प्रेरणा दिली, तर दुसरीकडे मातृभूमीच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी एतद्देशीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले.