
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरही देशाच्या जडण-घडणीत महाराष्ट्राने कायमच भरीव, मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत दिल्लीत केंद्रीय मंत्री झालेल्या मराठी नेत्यांनीदेखील ही परंपरा कायम राखली. त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा धनजंय बिजले यांनी ‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व’ ह्या आपल्या पुस्तकात सविस्तरपणे मांडला आहे. पुस्तकाच्या ह्या पहिल्या भागात १६ नेत्यांच्या कारकिर्दीचा पट उलगडण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, सी.डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंत साठे, राम नाईक, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी अशा १६ कर्तृत्ववान नेत्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीची एकत्रित माहिती देणाऱ्या ह्या पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या हाती महत्त्वाचा दस्तावेज उपलब्ध झाला आहे.
वैशिष्ट्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना.
दिल्लीसह देशाच्या राजकारणील १६ मराठी नेत्यांची माहिती छायाचित्रांसह एकत्रित उपलब्ध.
प्रकाशक : शुभम साहित्य
पृष्ठे : ३३२ मूल्य : ४०० रु.