

The Conclusion of Amma's Moonlit Tale
Sakal
गौरी देशपांडे
अम्मासोबत शेतात गेलो, की ती नेहमी एक गोष्ट सांगायची. मला ती गोष्ट ऐकायला खूप आवडायचं. कारण त्या गोष्टीचा शेवट आहेच तसा मजेशीर. दरवेळी त्या गोष्टीची सुरुवात करताना अम्मा तिचं एक ठरलेलं वाक्य म्हणायची. ते म्हणजे, ‘‘...तेव्हा तू दहा महिन्यांचा होतास आणि इथे एका टोपलीत झोपला होतास.’’