
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
कोरडी, रूक्ष, भकास वाटणारी सृष्टी बदलवून हिरवीगार करणारा हा पाऊसही काही चमत्कारापेक्षा कमी नाही. असे चमत्कार, साक्षात्कार, तुमच्या-आमच्यासारख्या भटक्यांना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या भूमीत पावसाळ्याच्या दिवसांत पावलोपावली पहायला मिळतात. खरेतर पावसाळा हाच मावळचा ‘स्पेशल’ ऋतू. संततधार, धो-धो, मुसळधार, धुवाधार ही पावसाची सारी विशेषणे शोभून दिसतात, ती या मावळातच. ढगांचे गरजणे, पावसाचे बरसणे अनुभवायला यायलाच हवे. पावसाच्या बरसण्यालासुद्धा संगीताचाच स्पर्श असतो. याच्या थेंबांचे संगीत ऐकतच राहावेसे वाटते.