मेडिकल कॉलेजमध्ये येऊन स्थिरावायला दीड वर्ष लागलं होतं मला. त्या काळी कॅलेंडरमधल्या दीड वर्षाचे एक शैक्षणिक वर्ष असायचे. मी, सेकंड एम.बी.बी.एस.मध्ये पाय ठेवले होते. औषधविज्ञान अर्थात फार्मेकॉलॉजी हा नवा विषय शिकायचा होता. सकाळी आठ ते नऊ ह्या वेळात लेक्चर असायचं.