ध्यानधारणा हवी रोजच्या जगण्यात

श्रेष्ठा बेपारी
Sunday, 19 July 2020

योग, ध्यान आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे आयुष्याला एक पूर्णपणे चांगले वळण लागेल. पण तुम्ही ज्याप्रकारचे आयुष्य(लाईफस्टाईल) जगत आहात, त्याचाही पाठिंबा या सर्व गोष्टींना मिळायला हवा. समजा तुम्ही जीममध्ये रोज घाम गाळून व्यायाम करत आहात, पण तुम्ही त्यासाठी लागणारे डाएट पाळले नाही तर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार नाही. ध्यानधारणाही अगदी त्याचप्रमाणे काम करते.

entertainment ध्यानधारणा केल्याने माझे प्रश्‍न सुटतील?
योग, ध्यान आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे आयुष्याला एक पूर्णपणे चांगले वळण लागेल. पण तुम्ही ज्याप्रकारचे आयुष्य(लाईफस्टाईल) जगत आहात, त्याचाही पाठिंबा या सर्व गोष्टींना मिळायला हवा. समजा तुम्ही जीममध्ये रोज घाम गाळून व्यायाम करत आहात, पण तुम्ही त्यासाठी लागणारे डाएट पाळले नाही तर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार नाही. ध्यानधारणाही अगदी त्याचप्रमाणे काम करते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ध्यान योग्य पद्धतीने शिकून घेतल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने सराव केल्यास जीवनात मोठे बदल होतात. ध्यान बुद्धीला तीक्ष्ण करते, मन शांत करते जेणेकरून आपण कोणताही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कधीही चुकत नाही. ते अंतर्गत बदल करण्यास मदत करते, ज्यामुळे आपला चांगला दृष्टिकोन विकसित होतो. ध्यान करणे ही एक जीवनशैली आहे आणि ते दररोज सकाळी फक्त एक तास करण्यापुरतेच नाही. ते संपूर्ण दिवसभर तुम्हाला मदत करत असते. ध्यानाचा लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जागरूकता विकसित करण्यासाठी सराव करा.

नवीन दृष्टिकोन विकसित करा
मी निराश खूप झालो आहे आणि त्यामुळे माझा राग माझ्या कुटुंबींयावर तसेच ऑफिसच्या कामांवर निघतो. या रागाला मी कसे नियंत्रित करू?

निराशा ही एक सर्वसाधारण भावना आहे. तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट मिळवण्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास निराशा येते. आपल्या आयुष्यात अशा खूप घटना येतात, ज्यातून आपल्याला निराशा येते. त्यामुळे राग येणे, ही निराशा व्यक्त करण्याची एक भावना असू शकते. निराशा आलेल्या माणसामध्ये ही भावना नेहमीच जाणवते. तुम्ही अशा परिस्थितीत अडकल्यासारखे तुम्हाला वाटत असल्यास, एक पाऊल मागे जा आणि आत्मपरीक्षण करा. तुम्ही स्वत:साठी एक वास्तववादी ध्येय ठेवले पाहिजे. आपल्यासारखीच परिस्थिती असलेल्या इतर लोकांशी बोला आणि नवीन दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करा. आवश्यक असल्यास हवे ते साध्य करण्यासाठी आपली कौशल्ये विकसित करा. यासाठी तुम्ही मानोसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेऊ शकता. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meditation is needed in daily life