
गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com
‘‘सगळे मूर्खेत रे! सौ फीसदी मूर्ख! काय एकेकाची अक्कल! हे पाहा, बळी तोच कानपिळी असतो हे कळायला किती वेळ अन् पिढ्या घेणार तुम्ही? न्याय बीय काही नसतं हे का कळू नये तुम्हाला? घोडमे कुठले !’’
‘ढाचा’ सर्वसाधारणपणे कुठल्याही संवादाची सुरुवातच अशी करतो. इतरांना मूर्ख ठरवून स्वतःकडे शहाणपणाचा मक्ता घेऊन विषय पुढे सरकतो.