२०२५च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत दोन बंगाली गाणी पात्र ठरली आहेत. पाच बंगाली कलाकार त्या गाण्यांशी संबंधित आहेत. गेली काही वर्षं अपयश पचवत असलेल्या बंगाली कलाक्षेत्रात जणू प्राण फुंकले गेले आहेत. एकूण ८९ गाण्यांशी त्यांची स्पर्धा आहे. त्यांनी मारलेली मजल उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.