
‘लेखकाचे घर’... सामान्य लोकांत या दोन शब्दांविषयी कमालीची उत्सुकता असते. आपला आवडता लेखक किंवा कलाकार कसे राहत असतील, त्यांच्या आवडी निवडी काय असतील, घरातील इतर व्यक्तींशी ते कसे वागत असतील, अशा असंख्य छोट्या-छोट्या गोष्टींकडे सामान्य नेहमी कुतुहलाने बघत असतात. आज प्रसिद्ध लेखक, नाटककार जयवंत दळवी यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त आपल्या घराबाबतच्या आठवणी जागवल्या आहेत, जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीश (Girish) यांनी , जयवंत दळवी (Jaywant Dalvi) हे जसे एक नामांकित लेखक होते तसेच ते घरात वडील, भाऊ, सासरा, आजोबा, मित्र आणि अशी बरीच नाती निभावत होते. जसजशी ही नाती बदलतात तसे या घराच रूपही बदलत जात.
शिवाजी पार्कजवळ मलिक इमारतीत आम्ही राहत होतो. ते आमच पहिल घर. त्या घराचं लेखकाच्या घरात सर्वप्रथम रूपांतर झालं ते माझ्या आठवणीप्रमाणे १९६२ साली. त्यावर्षी बाबांना ‘चक्र’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला; मात्र त्यानंतरही आमच घर नेहमी लेखकाच मात्र आमचं घर हे कायमचं लेखकाचं घर नसतं घराचा रूप बदलतं राहतं मुख्यतः बाबांची इतर व्यक्तींची नाती बदलत राहीली . यामुळे माझी धाकटी बहीण सौ सुभा जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा ती तिच्या माहेरी येते तिचा नवरा राजन येतो तेव्हा तो त्यांच्या सासरी येतो माझी भाची प्राजक्ता तिचा आजोळी येते त्यावेळेस आमचं घर हे लेखकाचे घर न राहता बाबांचं घर होतं स्वतः बाबा लेखक न राहता बाबा सासरा ,आजोबा होतात. नोकरीनिमित्त मी दिल्लीला होतो जेव्हा आम्ही मी माझी बायको आदिती व मुलगी शाल्मली सुट्टी मध्ये मुंबईला यायचो तेव्हा आम्ही फक्त आमच्या घरी यायचे शाल्मलीच्या दृष्टीने तर घरी जाऊन जय आबांना व उमाजीला माझी आई भेटणार अधिक महत्त्वाचं असतं. जयवंत दळवी ही व्यक्ती नामांकित लेखक आहे याची तिला जराही कल्पना नाही मात्र जयवंत दळवी ही व्यक्ती आपले जया बा आहेत एवढे तिला माहित आहे. आमचा दळवी कुटुंबा एका वटवृक्ष अवाढव्य पसरलेला आहे बाबांच्या पिढीपर्यंत, सर्व दळवी कुटुंबाचे आयुष्य हे आमच्या गावात हरवलेला वेंगुर्ले सावंतवाडी जवळ गेले आहे . पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे बाबांचे सर्व काका वगैरे एकत्र राहत होते त्यामुळे सर्व चुलत भावंड एकत्र वाढलेली आहेत सध्याच्या काळात दुर्लक्ष असे ऋणानुबंध या सर्व भावंडांमध्ये गुंफलेले गेलेले होते. दळवी घराण्यात बाबा एकमेव लेखक परंतु तरीही जेव्हा बाबा इतर नातेवाईकांच्या गोतावळ्यात असतात तेव्हा मात्र फक्त जय ,असतात . जया भाई, जया काका ,जया मामा किंवा जया आजोबा हे सगळे नातेवाईक आमच्या घरी येतात तेव्हा त्या लेखकाच्या घरी न येता भाऊ ,मामा, काका यांच्या घरी येतात.
असे वातावरण त्यावेळी होते. ते आज हि आम्ही टिकवून ठेवले आहे. तीच गोष्ट बाबांच्या अगदी जवळच्या मित्रांची कारंडे काका, नाडकरणी काका, भंडारे काका हे तिघे बाबांचे शाळेपासूनचे मित्र आजच्या जमान्यात असे मित्र मिल्ने कठीण बाबा असे पर्यंत हे मित्र दर महिन्याच्या एका रविवारी तिघेही मित्र आमच्या घरी एकत्र जमायचे त्यांच्या दृष्टीने जयवंत दळवी ही व्यक्ती फक्त त्यांच्या शाळा सोबती जय होती. त्या तिघांचे बाबांवर जे प्रेम होते एक मित्र म्हणून , बाबांची नाटक पाहणे ,लेख,कादंबऱ्या वाचून हि मंडळीं त्यावर बोलण्यासाठी त्यानिमित्ताने पुन्हा सर्वजण एकत्र येणार कलाकृतीवर कादंबरीवर चर्चा करणार करणार चुका दाखवून देणार आणि हे सर्व हसत-खेळत होत असताना हे सर्व एकूण घेणारी लेखक जयवंत दळवी ही व्यक्ती कोणी तिसरीच आहे असा भास व्हायचा. परंतु आमचं घर हे लेखकाचे घर भास तर ते फक्त दोन प्रकारचे लोक आल्यामुळे पहिला म्हणजे जेव्हा इतर समवयस्क लेखक नाटककार कवी संपादक नाट्य मंडळी वगैरे मित्र घरी येतात तेव्हा त्यावेळी मात्र जयवंत दळवी ही व्यक्ती एकदम दळवी साहेब किंवा जयवंतराव होऊन जात. याला अपवाद फक्त एकच काय वि स खांडेकर यांचा ,मी त्यांना प्रथम पाहिले जेव्हा ते आमच्या घरी आले होते त्यावेळी मी पाच-सहा वर्षाचा असेल त्यावेळी खांडेकर आमच्या घरी आले होते ते फक्त त्यांच्या विद्यार्थी जयवंत याला भेटायला नंतरच्या काळात कदाचित दोघांची भेट लेखक या नात्याने झाली असेल जेव्हा आमच्या घरी सर्वश्री पु ल देशपांडे ,वसंतराव कानेटकर, गोविंदराव तळवळकर, यशवंत दत्त, दामू केंकरे किंवा विजया मेहता यायच्या तेव्हा आमचा अक्षरशा सरस्वतीचे घर व्हायचे. आपल्या क्षेत्रात श्रेष्ठ व कर्तृत्ववान अशी व्यक्ती घरी आल्या की बाबा फक्त लेखक असत. त्यावेळी घरात ज्या साहित्यिक गप्पा चालायच्या त्यांना तोड नाही. सर्व संभाषण ऐकताना फार मजा वाटायची . त्यावेळी आनंदही होत असे. आणि वाटायचं की बाबा लेखक झाल्यामुळेच आम्हाला हा आनंद मिळतो. दुसरा प्रकार म्हणजे वाचक ,नवा लेखक, प्रकाशकया लोकोंना बाबा मात्र या सर्व लोकांना आवर्जून मार्गदर्शन करतात. तर काही लोकांना नाराज व निराश हि करतात अर्थात हे काही लोक बाबांना लेखक जयवंत दळवींना एखाद्या समारंभाचे अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला आलेले असतात. या सर्वा मध्ये बाबांचा एकच कटाक्ष असायचा तो म्हणजे लेखकाचे घर हे या सर्व लोकांना अतिथी गृहासारखे घर वाटले पाहिजे .
हा त्यांचा कटाक्ष असायचा. साहित्य ,माणसं, नातेवाईक, मित्र ,ओळखीचे लोक याशिवाय एक गोष्ट जिच्यावर बाबांचे अतिशय जिवापाड प्रेम होते. ती म्हणजे ताजी मासळी ,वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि स्वतःला व इतरांना खाऊ घालण हा बाबांचा अतिशय आवडता उद्योग , गोव्याला आरवली ला जायला अतिशय खूश असायचे जेव्हा बाबांचे खास मित्र घरी जेवायला येणार असायचे तेव्हा तर आमचं घर हे घर न राहता प्रति आनंदाश्रम किंवा प्रति सिंधुदुर्ग बनत असे. त्यादिवशी बाबा करली, चेनी ,खांड ,हलव्याची कल्कुटी, वाळवलेल्या पापलेट कोलंबीची आमटी वगैरे प्रकार आईला करायला सांगायचे . त्या दिवशी घरात फक्त मासळीचा वास येतो त्यातून जर खास मित्र साहित्यीक असतील तर घराला साहित्य सहवास येत असे. घरात मात्र बाबा फक्त बाबाच असत. ते कुठलीही कादंबरी किंवा नाटक केल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला वाचायला देत आम्ही प्रदर्शित केलेल्या मतांवर बाबा विचार करता स्पष्टीकरण द्यायचे, त्यावेळी थोडक्यात घरी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम लागायचा जरूर तर म्हणजे त्यांना पटलं तर बदलही करायची मात्र बाबाज्या वेळी लिखाण करायचे त्या वेळी त्यांना त्रास दिलेला मुळीच आवडायचा नाही त्यामुळे दर शनिवार-रविवार विशेषता संध्याकाळी आम्ही सर्वजण घरा बाहेर जायचं अर्थात कधी कधी बाहेरच्या लोकांचा त्रास होईल तो टाळण्यासाठी विशेषता दिवाळी अंकासाठी कादंबरी किंवा नाटक लिहिण्याच्या वेळी बाबा चक्क पुणे ,गोवा किंवा आरवली येथे आपला मुक्काम ठोकायचे.
बाबा लेखनात मग्न असायचे तेव्हा त्यांचे निरीक्षण करणे हा सर्वात आनंददायक क्षण असायचा ,बाबा नेहमीच टेबलावर लिखाण करायचे असे नाही पण आजच्या दिवसात तर चटईवर आसन मांडी ठोकून लिखाण करायचे समोर छोटू सर उत्तर तर मीच बाजूला कागद, पेन्सिल ,पट्टी, समास आखण्यासाठी साठी लागणारी हत्यारे शाईची दौत व टाक . बाबानि पेनाचा वापर कधीच केला नाही किंवा बॉलपेनने काही लिहित नाही. त्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे टाक व निबा होत्या बाबांचा सगळं लिहिणं एक टाकी ,काही बदल केले तर बाबा मजकूर नवीन कागदावर लिहायचे बाबांची आणखी एक आवडती गोष्ट म्हणजे तेलाने मालिश करून घेणे त्यासाठी प्रत्येक सोमवारी संध्याकाळी एक मालिश वाला घरी यायचा घरी बाबांनी वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक तेल आणून ठेवलेली होती मालिश करून घेत असताना बाबांची ब्रम्हानंदी टाळी लागाची . अश्यावेळी सम्पूर्ण घरात या तेलाचा वास दरवळत असायचा मालिश सुरू असताना कोणी खोलीत आलेला त्यांना चालत नसायचे अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा हे आम्हा सगळ्यांशी एका मित्राप्रमाणे वागायचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बाबा म्हणजे आपला समवयस्क मित्र वाटायचं. माझ्या मुलीला शाल्मलीला सुद्धा, दोघे जेव्हा रंगात येऊन गप्पा मारायचे तेव्हा आमचं घर हे त्यांच्या पुरतच असलेलं छोटं विश्ववच . दोघेही अशा रीतीने बोलतील की परक्या व्यक्तीला असं वाटेल की आपण चुकून एखाद्या शाळेतल्या बाल वर्गातच आलो आहोत येथे दोन लहान मुलं गप्पागोष्टी करत आहे हितगुज करत आहेत त्या क्षणाला बाबा अगदी शाल्मलीच्या वयाचे व्हायचे त्यांना आपल्या नावाचे किंवा प्रसिद्धीचे काही भान नसायचं ते गेले तरी आजही त्यांच्या आठवणी मात्र मनात तश्याच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.