#MokaleVha : माझा घटस्फोटाचा दावा न्यायप्रविष्ट आहे. माझा मुलगा भेटीसाठी आला असता, लॉकडाउनमुळे माझ्याकडे महिनाभर अडकला

#MokaleVha : माझा घटस्फोटाचा दावा न्यायप्रविष्ट आहे. माझा मुलगा भेटीसाठी आला असता, लॉकडाउनमुळे माझ्याकडे महिनाभर अडकला

माझा घटस्फोटाचा दावा न्यायप्रविष्ट आहे. माझा मुलगा भेटीसाठी आला असता, लॉकडाउनमुळे माझ्याकडे महिनाभर अडकला. दरम्यान, पत्नीशी सतत संपर्कात येऊन आमची जवळीक निर्माण झाली. आम्ही परत एकत्र येण्यासाठी कायद्याने अडचण येईल का?
- लॉकडाउनमुळे बरीच नाती दुरावली, बरीच नाती एकमेकांचा जास्त वेळ सहवास लाभल्याने सुधारली. पती-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत जाण्याचे मुख्य कारण बऱ्याचदा एकमेकांशी असलेला विसंवाद, एकमेकांसाठी नसलेला वेळ असते. पुष्कळदा स्त्रीच आई म्हणून मुलाला वाढविण्यात गुंतते व तिचे पतीकडे दुर्लक्ष होते. पुरुषही आपल्या कामात गुंततात. त्यामुळे पती-पत्नीत हळूहळू दुरावा निर्माण होतो. तुमच्यावरही परिस्थितीमुळे मुलाला सांभाळायची जबाबदारी आल्याने नकळतपणे तुमचेही मुलाबरोबरचे नाते घट्ट झाले. पत्नीबरोबर तुमच्या झालेल्या सुसंवादामुळे तुमच्या नात्यात विश्वास निर्माण झाला. मुलाच्या आणि तुमच्या भवितव्यासाठी एकत्र येण्याचा तुमचा सकारात्मक निर्णय आहे. तुम्हाला एकत्र येण्यासाठी कायद्याचा अडसर येणार नाही. त्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी वकिलांचा सल्ला घ्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपत्यासाठी प्रयत्न करण्यासाठी माझ्या पत्नीने उच्च पदावरची नोकरी सोडली. परंतु, बाळ होत नसल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. त्यातच सरोगसी कायद्यात बदल झाल्याचे कळले.
- स्त्रीने करिअरमध्ये कितीही प्रावीण्य मिळविले तरी आई झाल्याशिवाय तिचे आयुष्य परिपूर्ण नाही, अशी मानसिकता समाजात रुजलेली आहे. तुमच्या पत्नीनेही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी करिअरची संधी सोडून समाजातल्या दबावामुळे व त्यांच्यावरही तसाच मानसिक पगडा असल्याने स्वत:चे मूल होणे एवढेच आयुष्याचे ध्येय ठेवले आहे. वर्षानुवर्षे वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम झाले असतील. भारतात सरोगसी कायद्यात क्लिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे तुम्ही अनाथ मूल दत्तक घेतले, तर तुमची मुलाची व त्याचीही आयुष्यातील आई-वडिलांची कमतरता पूर्ण होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com